मायावतींनी दिला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा

मायावतींनी दिला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा

. मायावतींनी राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडे तीन पानांचा राजीनामा सोपवलाय.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जुलै : बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आज तडकाफडकी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिलाय. सहारनपूर हिंसेबाबत सभागृहात बोलण्यास संधी न दिल्याने आज सकाळीच त्यांनी उद्विग्न होऊन सभाग्रह सोडत होतं आणि राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार संध्याकाळी पाच वाजता त्यांनी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. पण सूत्रांच्या माहितीनुसार त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नसल्याचं सांगितलं जातंय.

पुढील वर्षी एप्रिलमध्ये मायावती यांच्या राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ संपणार होता. ''मी ज्या समाजातून येते, त्यांचेच मुद्दे मला सभागृहात मांडता येत नसतील, तर काय उपयोग?, असे मायावती यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील दलितांवरील अत्याचाराचा मुद्दा मायावती राज्यसभेत उपस्थित करु पाहत होत्या. मात्र, त्यांना बोलण्याची संधीच दिली गेली नाही, त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय. पण त्याचं हे राजीनामास्त्र उत्तरप्रदेशात गमावलेला दलितांचा जनाधार मिळवण्यासाठी कितपत फायदेशीर ठरतं हे आगामी काळात दिसून येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 05:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading