राहुल गांधींना धक्का, मध्य प्रदेशात मायावती स्वबळावर लढणार!

राहुल गांधींना धक्का, मध्य प्रदेशात मायावती स्वबळावर लढणार!

स्वबळावर भाजपला रोखणं सध्याच्या राजकीय स्थितीत काँग्रेसला शक्य नाही. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पण त्याला यश आलेलं नाही.

  • Share this:

भोपाळ 25 डिसेंबर : भाजपविरोधात महाआघाडी तयार करण्यासाठी राहुल गांधी पूर्ण ताकद लावत असतानाच मायावतींनी त्यांच्या स्वप्नांना सुरूंग लावलाय. मध्य प्रदेशात स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा मायावतींनी केली आहे. राज्यातल्या 40 लोकसभा जागांपैकी 29 जागा बसपा स्वबळावर लढवेल अशी घोषणा मायावती यांनी सोमवारी केली. मायावतींच्या या घोषणेमुळे महाआघाडीचे तीन तेरा वाजण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभे निवडणुकीत काँग्रेसने बसपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं. त्यामुळं बसपा आणि काँग्रेस जवळ येत असल्याचीही चर्चा होती. मात्र मायवतींनी राहुल गांधींना धक्का देत नवी व्ह्युवरचना केल्याचं स्पष्ट झालं.

लोकसभा निवडणुकीत भाजपला जर बहुमत मिळालं नाही तर छोट्या पक्षांचं महत्त्व वाढणार आहे. हा अंदाज आल्यान मायवतींनी स्वबळाचा नारा दिलाय. या आधी राष्ट्रवादी सहीत काही पक्षांनी काँग्रेससोबत निवडणुकीआधी जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं.

मे महिन्यात कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या शपथविधी कार्यक्रमाला मायावती यांच्यासह विरोधी पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. त्यानंतर भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र येणार असं बोललं जाऊ लागलं. मात्र काही महिन्यांमध्येच ही एकी विरून गेली. काँग्रेस अहंकारी आहे प्रादेशिक पक्षांना किंमत देत नाही असा आरोप करत मायावती यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती.

भाजपला रोखण्यासाठी महाआघाडी तयार करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना आणखी एक धक्का बसला होता. भारतीय कम्युनिष्ट पक्षाने (सीपीएम) काँग्रेससोबत कुठलीही आघाडी करायला नकार दिला आहे. काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीआधी कांग्रेससोबत आघाडी करणार नाही. निवडणुकीनंतर विचार करू असं पक्षाने जाहीर केलं आहे.

सीएमची एप्रिल महिन्यात पक्षाचं महाअधिवेशन होणार आहे. आणि त्याच दरम्यान निवडणुकाही होणार आहेत. पण काँग्रेस सोबत न जाण्यावर पक्ष ठाम आहे. सर्व मुद्यांचा बैठकीत विचार करण्यात आला आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं पक्षानं म्हटलं आहे. निवडणुकीनंतर सर्व पर्याय खुले राहितील असंही पक्षानं जाहीर केलं आहे.

स्वबळावर भाजपला रोखणं सध्याच्या राजकीय स्थितीत काँग्रेसला शक्य नाही. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र प्रत्येक प्रादेशिक पक्षाचं स्थानिक राजकारण हे वेगळं असल्याने महाआघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता दिसत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही महाआघाडीची शक्यता फेटाळून लावली होती.

VIDEO: 'मला मराठी येत नाही, हिंदीत बोला', महापौर कलानी वादाच्या भोवऱ्यात

First published: December 24, 2018, 4:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading