नवी दिल्ली, 15 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपा प्रमुख मायावती यांना निवडणूक आयोगानं प्रचारबंदी केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानं दोन्ही नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. योगी आदित्यनाथ यांना 72 तास तर, मायावती यांच्यावर 48 तास प्रचारबंदी घालण्यात आलेली आहे. 16 एप्रिल पासून ही प्रचारबंदी लागू होणार आहे. यापूर्वी प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी भडकाऊ भाषणं केली होती. त्याची दखल आता निवडणूक आयोगानं घेत दोन्ही नेत्यांच्या प्रचारावर बंदी घातली आहे. योगी आदित्यनाथ हे भाजपचे तर, मायावती या बसपा - सपा आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत.
Mayawati in Aligarh: BJP ki kendra mein sarkar rahi, galat karyapranali ki wajah se iss baar satta se bahar chali jaegi. Is chunaav mein inki koi bhi natakbaazi aur jumlebaazi kaam mein aane wali nahi hai aur khaskar inki ye chowkidaari ki nayi natakbazi bhi inko bacha nahi paegi pic.twitter.com/WmZP7F0yPY
— ANI UP (@ANINewsUP) April 15, 2019
Election Commission bans UP CM Yogi Adityanath and BSP chief Mayawati from election campaigning for 72 hours & 48 hours respectively, starting from 6 am tomorrow, for violating Model Code of Conduct by making objectionable statements in their speeches. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/j1cYzMY8Mr
— ANI UP (@ANINewsUP) April 15, 2019
काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ यांनी भारतीय सेनेचा उल्लेख 'मोदी की सेना' असा केला होता. या वक्तव्याची दखल घेत निवडणूक आयोगाने घेत योगी आदित्यनाथ यांना नोटीस देखील पाठवली होती. त्यानंतर आता त्यांच्या प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे.
VIDEO: जयाप्रदांनंतर आझम खान यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
काय म्हणाल्या होत्या मायावती
बसपाच्या नेत्या मायावतींनी उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर आणि बरेली जिल्ह्यात मुस्लीम मतदारांना आवाहन केलं होतं. मतांचं विभाजन होण्यापासून सावध राहा, असा इशाराच त्यांनी दिला होता. यानंतर, आपण हे वक्तव्य बहुजन समाजाला उद्देशून केलं, मुस्लिमांना नाही, अशी सारवासारव मायावतींनी केली.
दरम्यान, या दोन्ही नेत्यांनी केलेली विधान त्यांना भोवली असून त्यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करत प्रचारबंदी केली आहे. लोकसभा निवडणुकीत नेते पातळी सोडून प्रचार करताना दिसत आहेत. त्यावरू आता निवडणूक आयोगानं कठोर करवाईला सुरूवात केली आहे. त्याचा पहिला दणका हा योगी आदित्यनाथ आणि मायावती यांना बसला आहे.
VIDEO: उर्मिला मातोंडकरांच्या प्रचार सभेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा, युवकांना मारहाण
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा