उत्तर प्रदेशात 'सायकल'ला मिळालं 'हत्ती'चं बळ, काँग्रेसला दोन जागांचं गिफ्ट!

उत्तर प्रदेशात 'सायकल'ला मिळालं 'हत्ती'चं बळ, काँग्रेसला दोन जागांचं गिफ्ट!

मोदी आणि भाजपच्या आव्हानामुळे उत्तर प्रदेशात कट्टर राजकीय विरोधक एकत्र आले आहेत.

  • Share this:

लखनऊ 5 जानेवारी : मोदींचा वारू रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात कट्टर विरोधक असलेल्या मायावती आणि अखिलेश यादव यांनी आघाडी करण्याच्या निर्यणावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बसपा एकत्र येवून मोदींसमोर आव्हान उभं करणार आहेत.

ही आघाडी करत असताना या दोघांनीही काँग्रेसला बाजुला सारण्याचा निर्णय घेतला मात्र अमेठी आणि रायबरेली या दोन जागांवर ते उमेदवार उभे करणार नाहीत. शुक्रवारी दिल्लीत बसपाच्या अध्यक्षा मायावती आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी तब्बल तीन तास मॅरेथॉन बैठक घेतली.

या बैठकीत आघाडीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय. दोन्ही पक्ष उत्तर प्रदेशात 37-37 जागा लढवणार आहेत. तर 2 किंवा 3 जागा राष्ट्रीय लोकदल आणि 2 जागा इतर स्थानिक पक्षांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काँग्रेससाठी दिलासादायक बाब म्हणजे अमेठी आणि रायबरेलीच्या लोकसभेच्या जागेवर महाआघाडी उमेदवार देणार नाही.

मायावती आणि मुलायमसिंग हे ऐकेकाळचे कट्टर शत्रू. बसपा आणि सपामध्ये विस्तवही जात नव्हता. मात्र मोदी आणि भाजपच्या आव्हानामुळे हे कट्टर राजकीय विरोधक एकत्र आलेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या तब्बल 80 जागा आहेत. त्यामुळं सर्वच पक्षांचं उत्तर प्रदेशवर लक्ष असतं. विधानसभा निवडणुकीत सपा आणि काँग्रेसने आघाडी केली होती. मात्र त्यांना सपाटून मार खावा लागला होता.

First published: January 5, 2019, 7:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading