सोनिया गांधींच्या 'डिनर डिप्लोमसी'त, 17 पक्ष सहभागी; मायावती ममता अनुपस्थित

सोनिया गांधींच्या 'डिनर डिप्लोमसी'त, 17 पक्ष सहभागी; मायावती ममता अनुपस्थित

या बैठकीला शरद पवार अनुपस्थिती लावणार अशी चर्चा होती. मात्र शरद पवारांनी हजेरी लावून सर्वांनाच धक्का दिला

  • Share this:

13 मार्च : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज मोदी सरकारविरोधात एकत्र येण्यासाठी विरोधकांना स्नेहभोजन केलं . 17 विरोधी पक्ष या स्नेहभोजनात सहभागी  झाले.

सोनिया गांधींनी आयोजित केलेल्या या स्नेह भोजनाला  तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, द्रमुक, समाजवादी पार्टी आणि इतर अशा 17 पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.या बैठकीला शरद पवार अनुपस्थिती लावणार अशी चर्चा होती. मात्र शरद पवारांनी हजेरी लावून सर्वांनाच धक्का दिला. दरम्यान ममता बॅनर्जी आणि मायावती यांनी बैठकीला अपेक्षेप्रणाणे अनुपस्थिती लावली. भाजप सरकारविरोधात रणनिती आखण्यासाठी सोनिया गांधींनी ही बैठक बोलावली होती.

'या'  नेत्यांनी लावली हजेरी

मलिकार्जुन खरगे

प्रेम रामचंद्रन

मुक्ता राजू

जोसेक मणी

रणदीप सुरजेवाला

बाबुलाल मरांडी

मोहम्मद सलीम

डी. राजा

कनिमोळी

रामगोपाल यादव

जितनराम मांझी

शरद यादव

शरद पवार

तारिक अन्वर

बी. के. गुंजलकुट्टी

ओमर अब्दुला

अजित सिंग

बदरुद्दीन अजमल

सुदीप बंडोपाध्यय

सतीश मिश्रा

2019 निवडणुकांसाठी काय रणनीती आखायची, यावर या डिनर मीटिंगमध्ये चर्चा झाली. याचे काय पडसाद आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 08:18 AM IST

ताज्या बातम्या