मायावतींचा हा सुटाबुटातला भाचा बनला स्टार प्रचारक

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींचा भाचा आकाश आनंद हा पक्षाचा स्टार प्रचारक असणार आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी आकाशला प्रचारात उतरवण्याचा निर्णय मायावतींनी घेतला आहे. आकाश हा मायावतींचा लहान भाऊ आनंद यांचा मुलगा आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 05:42 PM IST

लखनौ, 22 मार्च : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींचा भाचा आकाश आनंद हा पक्षाचा स्टार प्रचारक असणार आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी आकाशला प्रचारात उतरवण्याचा निर्णय मायावतींनी घेतला आहे. आकाश हा मायावतींचा लहान भाऊ आनंद यांचा मुलगा आहे.

लंडनमध्ये एमबीएची पदवी घेऊन आलेल्या आकाशने 2016 मध्ये मायावतींच्या सहारनपूर दौऱ्यात पहिल्यांदा जाहीररित्या भाग घेतला. 2017 मध्ये त्याने मेरठमधल्या सभेमध्येही मायवातींच्या सोबत व्यासपीठावर हजेरी लावली होती.

निळ्या रंगाचा सूट

निळा सूट आणि अगदी वेगळ्या ढंगाचे बूट घातलेल्या आकाशने अलीकडेच एका समारंभात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 15 जानेवारीला झालेल्या मायावतींच्या वाढदिवस सोहळ्यामध्ये तो मायावतींच्या मागे उभा असलेला दिसला. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव मायावतींना शुभेच्छा द्यायला आले त्यावेळच्या छायाचित्रातही तो झळकला. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव पाटण्याहून मायावतींना भेटायला आले तेव्हाही तो त्यांच्यासोबत होता.

तेव्हाच, आकाश हा मायावतींचा वारसदार आहे का ? असा प्रश्न प्रसारमाध्यमांमध्ये विचारला गेला. पण प्रसारमाध्यमं आकाशला विनाकारण लक्ष्य करत आहेत, आकाशच्या बुटांवरून त्याच्यावर झालेली टीका अनाठायी आहे, असं त्या म्हणाल्या होत्या. आकाशला आपण बहुजन समाज पक्षाच्या चळवळीमध्ये सहभागी करून घेतोय, असं त्यांनी म्हटलं होतं.

Loading...

भावाची नेमणूक मागे

याआधी, मायावतींनी त्यांचा भाऊ आनंद यांची राष्ट्रीय पातळीवरच्या उपाध्यक्षपदी नेमणूक केली होती. पण यानंतर त्यांच्यावर घराणेशाहीचे आरोप झाल्याने त्यांनी ही नेमणूक मागे घेतली.

आकाशच्या रूपाने मायावती तरुण मतदारांना आकर्षित करू पाहतायत. तरुणांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी आपलं ट्विटर अकाउंटही उघडलं आहे. मायावतींचा हा प्रचार तरुणांना किती भावतो हे मात्र पाहावं लागेल.

=======================================================================================


पाध्येंच्या छोटूसिंगचं निवडणुकीचं रॅप साँग ऐकाच, मोदी-राहुल गांधींची घेतली फिरकी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2019 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...