लखनौ, 12 जानेवारी : 'मोदी शहा या गुरू-चेल्यांची झोप उडवणारी ही पत्रकार परिषद,' असं म्हणत बसपा अध्यक्षा मायावती यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सपाचे अखिलेश यादव आणि मायावती हे लोकसभा निवडणुकीत आघाडी करणार आहेत. याबाबत दोघांनी पत्रकार परिषद घेत घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागेल आहेत. दिल्लीची सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने उत्तरप्रदेश हे राज्य सर्वाधिक महत्त्वाचं मानलं जातं. याच राज्यात आता पारंपारिक राजकीय विरोधक सपा आणि बसपा यांची आघाडी आता निश्चित झाली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशातील 80 पैकी 73 जागा मिळाल्या होत्या. सपा आणि बसपा या दोन पक्षांमध्ये झालेल्या मतविभागणीचा मोठा फायदा भाजपला झाला होता. पण आता हे दोन पक्ष एकत्र येत आहेत. अशातच मोदींचा लाट काही प्रमाणात ओसरली असल्याचं निरीक्षण राजकीय विश्लेषक नोंदवतात. त्यामुळे उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. असं झाल्यास भाजपला बहुमत मिळवताना मोठी कसरत करावी लागू शकते.
ही आघाडी करत असताना या दोघांनीही काँग्रेसला बाजुला सारण्याचा निर्णय घेतला. मात्र अमेठी आणि रायबरेली या दोन जागांवर ते उमेदवार उभे करणार नाहीत. काही दिवसांपूर्वी दिल्लीत बसपाच्या अध्यक्षा मायावती आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी तब्बल तीन तास मॅरेथॉन बैठक घेतली.
VIDEO: मंचावरील मोदींच्या उपस्थितीने बदलला गडकरींचा सूर, नेहरू-इंदिरांवर जोरदार टीका