अहमदाबाद, 18 सप्टेंबर : 2002 मधल्या नरोडा पाटिया दंगलीप्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची आज कोर्टात साक्ष झाली. भाजपच्या माजी आमदार माया कोडनानी यांच्या बाजूनं अमित शहा यांची साक्ष झाली. कोडनानी या प्रकरणात आरोपी आहेत.
पण दंगल झाली तेव्हा आपण सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतो आणि अमित शहासुद्धा आपल्या सोबतच होते, असा दावा कोडनानी यांनी केलाय. दंगल झाली त्या दिवशी कोडनानी नरोडा पाटियाला गेल्या नव्हता, असं अमित शहा यांनीही साक्षीत सांगितलंय.
नरोडा पाटियामध्ये झालेल्या दंगलीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी माया कोडनानी गुजरात सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या. माया कोडनानी या दंगलीच्या सूत्रधार होत्या, असा ठपका कोर्टाने ठेवला आहे. याआधी झालेल्या या खटल्याच्या सुनावणीत कोडनानी यांनी साक्षीदार म्हणून अमित शहा यांना हजर करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितला होता.
गुजरातमध्ये २00२ साली झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीच्या संदर्भात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी १८ सप्टेंबर रोजी कोर्टात साक्ष देण्यासाठी यावे यासाठी समन्स निघाले. नरोदा पाटिया येथील दंगलीच्या प्रकरणी गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांना याआधी न्यायालयाने दोषी ठरवलं. आता नरोदा गावात झालेल्या दंगलीतील सहभागाबद्दल विशेष कोर्टात खटला सुरू असून, बचाव साक्षीदार म्हणून अमित शहा यांचं नाव आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, माया कोडनानी मंत्री होत्या.
नरोदा येथे जेव्हा दंगल झाली, तेव्हा आपण अमित शहा यांच्यासमवेत रुग्णालयात गेलो होतो, त्यामुळे आपला दंगलीत सहभाग नाही, असा दावा माया कोडनानी यांनी कोर्टात केला होता.
काय आहे नरोडा पाटिया प्रकरण?
- 2002च्या गुजरात दंगली दरम्यान नरोदा पाटिया इथं हत्याकांड
- 11 मुसलमानांची हत्या करण्यात आली होती
- माया कोडनानी यांनी जमावाला भडकावल्याचा आरोप
- या प्रकरणी माया कोडनानींसह 82 जणांवर आरोप
- माया कोडनानींसह 31 जण दोषी
- कोडनानी यांना २८ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय
- प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोडनानी यांना जामीन देण्यात आलाय
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा