Home /News /national /

सामान्य भाविकांप्रमाणे प्रियंका गांधींनी देखील केले गंगास्नान, मौनी अमावस्येनिमित्त काँग्रेस सरचिटणीस प्रयागराजमध्ये

सामान्य भाविकांप्रमाणे प्रियंका गांधींनी देखील केले गंगास्नान, मौनी अमावस्येनिमित्त काँग्रेस सरचिटणीस प्रयागराजमध्ये

Mauni Amavasya 2021 Priyanka Gandhi Vadra: मौनी अमावस्येनिमित्त प्रियांका गांधी प्रयागराजमध्ये, सामान्य भाविकांप्रमाणे केलं गंगास्नान

    प्रयागराज, 11 फेब्रुवारी: कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आज उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये (Prayagraj, Uttar Pradesh) आहेत. मौनी अमावस्यानिमित्त प्रियांका गांधी यांनी संगम येथे सामान्य भाविकांप्रमाणे गंगास्नान केले. याठिकाणी स्नान आणि पूजा केल्यानंतर त्यांनी नाव देखील चालवली. याचाही एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये त्या नाव चालवत आहेत. ज्यामध्ये ती दोन्ही हातांनी बोटीवर बसताना दिसत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. प्रयागराजमधील संगमावर आज माघ महिन्यातील मेळ्याचे तिसरे स्नानपर्व आहे. मौनी अमावस्येच्या निमित्ताने मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. गंगा संगमावर स्नान केल्यानंतर प्रियंका गांधी मनकामेश्वर मंदिरात जाऊन देखील दर्शन घेणार आहेत. याठिकाणी त्या शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची भेट घेणार आहेत. (हे वाचा-UPMSP Time Table 2021: हायस्कूल आणि इंटर बोर्ड परीक्षांसाठी वेळापत्रक जाहीर) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP Assembly Election) काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाचा अजेंडा आपलासा करू इच्छित असल्याच्या प्रतिक्राया यानंतर उमटत आहेत.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Congress, Priyanka gandhi vadra, Uttar pradesh

    पुढील बातम्या