कोल्हापूरचा पैलवान माऊली जमदाडे ठरला महान भारत केसरी

कोल्हापूरचा पैलवान माऊली जमदाडे ठरला महान भारत केसरी

बेळगाव जिल्ह्यातल्या जमखंडीमध्ये महान भारत केसरी स्पर्धा पार पडली. त्यामध्ये कोल्हापूरच्या गंगावेश तालमीच्या माऊली जमदाडे यानं महान भारत केसरीचा किताब पटकावलाय.

  • Share this:

बेळगाव, 04 डिसेंबर: कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखलं जात. आणि याच कोल्हापूरच्या एका पैलवानानं कर्नाटक राज्यातल्या कुस्तीमध्ये विजयी पताका फडकावली आहे. कोल्हापूरच्या माऊली जमदाडेने बेळगावात जाऊन महान भारत केसरी किताब पटकावला आहे.

बेळगाव जिल्ह्यातल्या जमखंडीमध्ये महान भारत केसरी स्पर्धा पार पडली. त्यामध्ये कोल्हापूरच्या गंगावेश तालमीच्या माऊली जमदाडे यानं महान भारत केसरीचा किताब पटकावलाय. भारतीय कुस्ती संघाच्या वतीनं जमखंडीमध्ये ही कुस्तीची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी देशभरातले नामांकित मल्लही आले होते. त्यात पंजाब राज्याचा मल्ल अमित सरोहा याला घिस्सा डावावर चितपट करुन कोल्हापूरच्या माऊलीनं कुस्ती जिंकली.

विजेता माऊली याला 2 लाख रुपयांचं पारितोषिक आणि चांदीची गदा प्रदान करण्यात आली आहे.  या कुस्तीनंतर गंगावेश तालमीच्या सगळ्याच पैलवानांनी माऊली याचं जोरदार स्वागत केलं. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही जमखंडीच्या मैदानावर महान भारत केसरीचा मान हा याच गंगावेश तालमीच्या योगेश बोंबाळे यानं मिळवला होता. त्यानंतर यंदाही कोल्हापूरच्या या पैलनानानं कर्नाटक राज्यात आपल्या कुस्तीचं प्रदर्शन करत तिथलं मैदान मारलंय.

 

First published: December 4, 2017, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading