गुजराती असल्याचे सांगून 'मसूद अझहर'ने केला होता भारतात प्रवेश

गुजराती असल्याचे सांगून 'मसूद अझहर'ने केला होता भारतात प्रवेश

मसूद अझहरला दहशतवादाचं ट्रेनिंग अफगाणिस्तानमध्ये मिळालं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली 3 मार्च : जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर हा फक्त भारतालाच नाही तर सर्व जगातल्या अनेक देशांना हवा होता. अमेरिकेसह अनेक देश त्याच्या मागावर होते. मात्र तो कायम निसटत राहिला. भारताच्या IC 814 या विमानाच्या अपहरणानंतर भारतात त्याचं नाव सर्वांना माहित झालं.

मसूदच्या सुटकेनंतर वर्षभरातच जम्मू आणि काश्मीर विधानसभेवर आत्मघातकी हल्ला झाला होता. तो हल्ला मसूदनेच घडवला होता. मसूदच्या प्रत्यार्पणासाठी तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांनी प्रयत्न केले होते मात्र त्याला यश आलं नाही. भारतात त्याला अनेकदा अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या होत्या.

पाकिस्तानातल्या बहावलपूर इथं 1968 मध्ये मसूदला जन्म झाला होता. मसूदला पाच भावंड असून सध्या ते सर्वच जण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी आहेत. अफगाणास्तानात असलेल्या रशियन फौजांना हुसकावून लावण्यासाठी त्यावेळी जिहाद सुरू होता. त्यात पाकिस्तानातून अनेक तरुण सहभागी झाले होते. त्यातलाच एक मसूद होता.

अफगाणिस्तानात त्याला दहशतवादाचं सर्व प्रशिक्षण मिळालं होतं. काही वर्ष अफगाणिस्तानमध्ये राहून तो पाकिस्तानात परतला होता. सुरुवातीला तो हरकत-उल-मुजाहिदीन (HuM) या दहशतवादी संघनेत सहभागी झाला. तरुणांची डोकी भडकविण्यासाठी तो सदा-ए-मुजाहिद हे मासिक चालवत असे.

पाकिस्तानात परतल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाई करण्यासाठी त्याची निवड करण्यात आली. पोर्तुगालचा बनावट पासपोर्ट तयार करून तो पाकिस्तानातून बांगलादेशात गेला. त्यानंतर ढाक्यातून तो नवी दिल्लीला 29 जानेवारी 1993 ला भारतात आला.

नवी दिल्ली विमानतळावर सुरक्षा अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याला हटकलं आणि विचारलं तू पोर्तुगालचा नागरीक वाटत नाही तेव्हा मसूदने त्यांना उत्तर दिलं की तो मुळचा गुजराती आहे. त्यानंतर तो भारतात दाखल झाला होता. काश्मीरसह देशभर त्याने जैश ए मोहम्मदचं जाळ तयार केलं होतं.

First published: March 3, 2019, 6:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading