मराठी बातम्या /बातम्या /देश /

व्यसनी उंदरांनी फस्त केलं 581 किलो चरस; चक्रावलेल्या पोलिसांची कोर्टात धाव

व्यसनी उंदरांनी फस्त केलं 581 किलो चरस; चक्रावलेल्या पोलिसांची कोर्टात धाव

भगवान श्रीकृष्णाची नगरी, अशी मथुरा शहराची ओळख आहे. मात्र, सध्या हे शहर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलं आहे. तेथील उंदरांना चरस खाण्याचं व्यसन लागलं आहे.

भगवान श्रीकृष्णाची नगरी, अशी मथुरा शहराची ओळख आहे. मात्र, सध्या हे शहर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलं आहे. तेथील उंदरांना चरस खाण्याचं व्यसन लागलं आहे.

भगवान श्रीकृष्णाची नगरी, अशी मथुरा शहराची ओळख आहे. मात्र, सध्या हे शहर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलं आहे. तेथील उंदरांना चरस खाण्याचं व्यसन लागलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mathura, India

मथुरा, 24 नोव्हेंबर : भगवान श्रीकृष्णाची नगरी, अशी मथुरा शहराची ओळख आहे. मात्र, सध्या हे शहर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलं आहे. तेथील उंदरांना चरस खाण्याचं व्यसन लागलं आहे, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. पोलीस ठाण्यातील स्टोअर हाउसमध्ये जप्त करून ठेवलेलं 581 किलो चरस उंदरांनी खाऊन टाकल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांना जप्त केलेल्या चरस या अंमली पदार्थाबाबत विचारणा केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. उपद्रवी उंदरांचा बंदोबस्त करण्यास अपयश आल्याचं पोलिसांनी हतबल होऊन सांगितलं आहे.

शेरगड व महामार्ग पोलीस स्टेशननं 581 किलो चरस जप्त करून मालखान्यात (स्टोअर हाउस) ठेवलं होतं. हेच चरस उंदरांनी खाल्ल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. न्यायालयानं पोलिसांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर उंदरांच्या उपद्रवावर प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या शिवाय, न्यायालयाने पोलिसांना 26 नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्यास सांगितलं आहे.

2018 मध्ये शेरगड आणि महामार्ग पोलिसांनी दोन कारवायांमध्ये 386 आणि 195 किलो चरस जप्त केलं होतं. पोलिसांनी पुरावा म्हणून या चरसचा नमुना न्यायालयात सादर केला होता. मात्र, सातवे एडीजे (अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश), संजय चौधरी यांनी पोलिसांना जप्त केलेलं सर्व चरस सीलबंद पॅकेटमध्ये न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले. याला उत्तर देताना पोलिसांनी सांगितलं की, जप्त केलेलं सर्व चरस उंदरांनी खाऊन टाकलं आहे. त्यामुळे जप्त केलेलं चरस न्यायालयात सादर करता येणार नाही.

उंदरांच्या त्रासानं पोलीस त्रस्त

पोलिसांनी न्यायालयासमोर आपली असहायता व्यक्त केली. पोलिसांनी सांगितलं की, पोलीस स्टेशनच्या स्टोअर हाउसमध्ये उंदरांनी उच्छाद मांडला आहे. त्यांनी तेथील सर्व वस्तूंचं नुकसान केलं आहे. जप्त करून ठेवलेलं चरससुद्धा त्यांनी फस्त केलं आहे. यानंतर न्यायालयानं उंदरांच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणी फिर्यादी पक्षाशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

उंदरांनी चरस खाल्ल्याची घटना या पूर्वी ऐकण्यात आली नव्हती. मात्र, आपल्याला याचा अनुभव आल्याचं मथुरा पोलिसांचं म्हणणं आहे. यामध्ये कितपत तथ्य आहे, हे आता पोलिसांनाच माहिती. पण, या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

First published: