अल्पवयीन प्रेयसीने स्वत:ला घेतलं पेटवून, प्रियकराला समजताच त्यानेही उचललं मोठं पाऊल!

अल्पवयीन प्रेयसीने स्वत:ला घेतलं पेटवून, प्रियकराला समजताच त्यानेही उचललं मोठं पाऊल!

ग्रामस्थांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत प्रियसीचा मृत्यू झाला होता तर प्रियकराची प्रकृती चिंताजनक आहे.

  • Share this:

मथुरा (उत्तर प्रदेश), 29 सप्टेंबर : प्रेमातून गुन्हा घडल्याचे अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीने स्वत:वर अॅसिड ओतून घेत पेटवून घेतलं आहे. आत्महत्या करणारी तरूणी अवघ्या 15 वर्षांची असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन तरुणीचं 22 वर्षाच्या तरुणावर प्रेम होतं. सगळ्यात धक्कादायक म्हणजे प्रेयसीने आग लावून घेतल्याचं समजताचं प्रियकरानेही स्वत:ला आग लावून घेतली आहे.

ग्रामस्थांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत प्रियसीचा मृत्यू झाला होता तर प्रियकराची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला उपचारासाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, प्रेयसीच्या कुटुंबीयांनी कोणाला न सांगताच मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

इतर बातम्या - समलैंगिक असल्याचा आरोप करत तरुणीला बेदम मारहाण, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

गोवर्धनचे पोलिस उपअधीक्षक वरुण कुमार सिंह यांनी सांगितले की, गोवर्धन परिसरातील एका गावात राहणाऱ्या 15 वर्षीय तरुणीने स्वत: वर अॅसिड ओतून घरात आग लावून घेतली. शेजार्‍यांनी जेव्हा तिच्या घराबाहेर धूर येताना पाहिला तेव्हा त्यांचा गोंधळ उडाला. गावकरऱ्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तपोर्यंत तिचा मृत्यू झाला होता. प्रेयसीने स्वत:ला पेटवून घेतल्याचं प्रियकराला समजल्यानंतर त्यानेही स्वत: ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

इतर बातम्या - आताच डिलीट करा ‘हे’ धोकादायक 46 अ‍ॅप, Googleने जाहीर केली यादी

पोलिसांनी ताब्यात घेतला प्रेयसीचा मृतदेह

मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांनी तिचे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. अंत्यविधीसाठी तिला घेऊन जात असतानाच पोलीस तिथे पोहोचले. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, प्रियकराची परिस्थीत गंभीर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलीस सध्या घटनेचा कसून तपास करत आहेत.

इतर बातम्या - 'मृत्यूचा मेन्यू' चायनीज दुकानावर झाला वाद, तरुणाला डोक्यात रॉड घालून जागीच केलं ठार!

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

First published: September 29, 2019, 6:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading