101 कोटींच्या मालकीण आहेत हेमा मालिनी, 5 वर्षात 34 कोटींनी वाढली संपत्ती!

101 कोटींच्या मालकीण आहेत हेमा मालिनी, 5 वर्षात 34 कोटींनी वाढली संपत्ती!

गेल्या 5 वर्षात त्यांची मालमत्ता 34 कोटींनी वाढली आहे. हेमा मालिनी 101 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालक आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च: भापने उत्तर प्रदेशच्या मथूरामधून प्रसिद्ध अभिनित्री हेमा मालिनी यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. हेमा मालिनी या मथुरमधूनच खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी बुधवारी हेमा मालिनी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्जामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रात 101 कोटी संपत्ती असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे.

एकूण संपत्ती 101 कोटी

प्रतिज्ञापत्रानुसार, गेल्या 5 वर्षात त्यांची मालमत्ता 34 कोटींनी वाढली आहे. हेमा मालिनी 101 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालक आहेत. हेमा मालिनी यांच्या मालकीची एकूण मालमत्ता 1 अब्ज, 1 कोटी, 11 लाख, 95 हजार 300 रुपये आहे. तर त्यांच्या बँक खात्यातील ठेवी, रोख आणि दागिन्यांची रक्कम 13 कोटी 22 लाख 96 हजार 945 रुपये आहे. 2014 मध्ये हेमा मालिनींची मालमत्ता 66 कोटींची होती.

पतीची संपत्ती 12.30 कोटी रुपयांनी वाढली

प्रतिज्ञापत्रानुसार, गेल्या 5 वर्षांत धर्मेंद्र सिंह देओल यांच्या मालमत्तेची किंमत 12.30 कोटी रुपयांनी वाढली आहे. यात काही रक्कम त्यांना कोणालातरी देणे आहे. आयकर विभागाकडे सादर केलेल्या कर विवरणानुसार, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची एकत्रित मालमत्ता गेल्या पाच वर्षांत दरवर्षी 10 कोटींनी वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी 9.87 कोटी रुपयांची मालमत्ता घेतली आहे. त्याच काळात पती धर्मेंद्र यांनी 9.37 कोटी रुपयांची मालमत्ता घेतली आहे.

लोकसभा 2019: नितीन गडकरींच्या संपत्तीत 140 टक्क्यांनी वाढ!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नागपूरमधून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. गेल्या 5 वर्षात गडकरी यांच्या संपत्तीत 140 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गडकरींनी सादर केलेल्या माहितीनुसार 2017-18 मध्ये त्यांची उत्पन्न 6.4 लाख इतके होते. तर 5 वर्षापूर्वी 2013-14मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.7 लाख इतके होते. 2014-15 या आर्थिक वर्षात त्यांच्या उत्पन्नात 6 लाखांनी वाढ झाली. त्यानंतर त्यांचे उत्पन्न मात्र स्थिर आहे.

गडकरी यांच्या पत्नी कांचन यांच्या उत्पन्नात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न 4.6 लाख होते. त्यात 2017-18मध्ये वाढ होत ते 40 लाखावर पोहोचले आहे. यंदा प्रथमच उमेदवारांना गेल्या पाच वर्षातील आय टी रिटर्न्समधील उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार आहे.

एकूण संपत्ती 7 कोटी

गडकरींची एकूण संपत्ती 6.9 कोटी रुपये अतकी आहे. यातील 1.96 कोटी संपत्ती वडीलांकडून मिळालेली आहे. 2014च्या तुलनेत या संपत्तीत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वडीलांकडून मिळालेल्या संपत्तीचे मुल्य वाढल्याने ही वाढ झाली आहे.

पत्नीची संपत्ती 127 टक्क्यांनी वाढली

गडकरी यांच्या पत्नी कांचन यांच्याकडे 7.3 कोटी इतकी संपत्ती आहे. 2014च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 127 टक्के वाढ झाली आहे. गडकरी यांच्याकडे वरळी येथे एक फ्लॅट आहे. या घराची किमत 2014मध्ये 3.78 कोटी इतकी होती ती आता 12.5 टक्क्यांनी वाढून 4.25 कोटी झाली आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे 22 लाखांचे दागिने आहेत.

बँकतील पैसा कमी झाला

2014च्या तुलनेत गडकरी यांच्या बँकेतील ठेवी कमी झाल्या आहेत. बँकेत त्यांनी 9 लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. 2014च्या तुलनेत ही रक्कम 57 टक्क्यांनी कमी आहे. निवडणुकीचा खर्च करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र बँक खाते सुरु केले असून त्यात 1 लाख रुपये आहेत. शेअर बाजारातील त्यांची गुंतवणूक 78 टक्क्यांनी कमी झाली आहे. गडकरींकडे केवळ 3 गाड्या असून त्यापैकी एक अॅबेसिडर असून त्याची किमत 10 हजार इतकी सांगण्यात आली आहे. तर 20 लाखाची एक होडा देखील आहे.

कर्ज वाढले

गडकरींवर 2014मध्ये 1.3 कोटी इतके कर्ज होते. त्यात वाढ होते ते 1.57 कोटी इतके झाले आहे. याशिवाय त्यांच्यावर 3 गुन्हे देखील आहेत.

 

First published: March 27, 2019, 11:34 AM IST

ताज्या बातम्या