विराट आणि अमिताभला भेटायला पॉकेटमनी घेऊन चिमुकले आले मुंबईत!

विराट आणि अमिताभला भेटायला पॉकेटमनी घेऊन चिमुकले आले मुंबईत!

अमिताभ आणि विराटची एक झलक बघायला देशाच्या कान्याकोपऱ्यातून हजारो लोक मुंबईला येत असतात. असेच दोन छोटे १० आणि १४ वर्षाचे चिमुकले त्यांना भेटायला आपली पॉकेट मणी घेऊन थेट मुंबईला आले पण पोलिसांच्या सतर्कतेमुळं त्यांना परत आपल्या घरी जावं लागलं.

  • Share this:

मुंबई,ता.15 एप्रिल: अमिताभ आणि विराटची एक झलक बघायला देशाच्या कान्याकोपऱ्यातून हजारो लोक मुंबईला येत असतात. असेच दोन छोटे १० आणि १४ वर्षाचे चिमुकले त्यांना भेटायला आपली पॉकेटमनी घेऊन थेट मुंबईला आले असे आपल्याला कोणी सांगितले तर आपला विश्वास बसणार नाही, पण हो, हे अगदी खरे आहे.

मथुरा येथील दोन मुलं दूध आणण्यासाठी पैसे घेऊन घरून निघाले आणि सोबत अपली पॉकेटमनी घेऊन थेट ट्रेन मध्ये बसून मुंबईला आले. आणि ते अमिताभ यांच्या जलसा या बंगल्यावर आले पण त्यांची अमिताभशी भेट नाही होऊ शकली. नंतर दुसऱ्या मित्राने विराटला भेटण्याची इच्छा व्यक्त केली पण रात्र होत असल्यामुळे दोघेही परत जाण्यासाठी स्टेशनवर जाताना चुकून ते महिलांच्या डब्ब्यात बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हटकलं असता सर्व प्रकार मुंबई पोलिसांच्या लक्षात आला.

विचारपूस केल्यानंतर कळले कि हे घरून पॉकेटमनी घेऊन मुंबईला अमिताभ आणि विराटला भेटायला आले. पोलिसांनी त्याच्या घरी संपर्क केल्यानंतर कळले कि दोघेही घरून बेपत्ता आहेत घरच्यांनी पोलिसात दोघांचे अपहरण झाल्याच्या संशयावरून तक्रार केलेली होती.

दोघाही भावांची नावं १४ वर्षाचा भावेश आणि १० वर्षाचा अमन पाठक अशी आहेत. हे दोघेही मथुरेच्या गौरानगर कॉलनीत राहणारे आहेत. पोलिसांच्या सूचनेनंतर या दोघांचे कुटूंबिय मुंबईत आले आणि त्यांनी या दोघांनाही आपल्या घरी परत आणलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2018 06:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading