खन्ना (लुधियाना), 28 फेब्रुवारी : लुधियानातील खन्ना या भागात एक माथेफिरू प्रेमीने शाळेत घुसून इंग्रजीच्या शिक्षिकेवर एका धारदार शस्त्राने हल्ला केल्याची भीषण घटना समोर आली आहे. शिक्षिकेच्या चेहरा आणि डोक्यावर 10 हून जास्त वार करण्यात आले आहे. यानंतर शिक्षिकेला रुग्णालयात भरती करण्यात आले. तिच्यावर 3 तासांमध्ये 120 हून अधिक टाके लावण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. माथेफिरु आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रुग्णालयात भरती असलेल्या नवज्योत कोर यांनी सांगितले, आरोपी युवराज सिंह त्यांचा माजी विद्यार्थी आहे. एक महिन्यापूर्वी त्याने मोबाइलवर लग्नाच्या मागणीचा संदेश पाठविला होता. यावर शिक्षिकेने त्याची समजूत घातली होती. याबाबत शिक्षिकेने आपल्या कुटुंबीयांनाही सांगितले होते. पण माथेफिरूने ऐकले नाही. यानंतर त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आलं होतं. बुधवारीदेखील त्याची समजूत काढण्यात आली. आरोपीने सांगितले की, नवज्योत कौरने मला धोका दिला आहे आणि वेडं म्हणत माझ्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. यामुळे सूड घेण्यासाठी आरोपीने हे कृत्य केलं. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
हेही वाचा - 3 दिवसांच्या बाळावर सुरीने केले 20 वार, निर्घृणतेचे कळस पाहून डॉक्टर हादरले
शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना शिक्षिकेवर हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी गावातील डिएन एव्हरेस्ट मॉडल हायस्कूलमध्ये शिक्षिका नवज्योत कौर विद्यार्थ्यांना शिकवत होती. तेव्हा आरोपी वर्गात आला आणि प्रेमाला नकार दिल्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देऊन निघून गेला. शाळा सुटल्यानंतर नवज्योत घरी जात असताना तो पुन्हा वर्गात आला. त्याने धारदार शस्त्राने शिक्षिकेच्या चेहऱ्यावर व डोक्यावर सपासप वार केले. तो बराच वेळ तिच्या चेहऱ्यावर वार करीत होता. काही वेळाने आरोपीने तिथून पळ काढला. रक्ताने माखलेल्या अवस्थेत शिक्षिका जमिनीवर कोसळली. काही वेळाने शाळेचे कर्मचारी आले व त्यांनी तिला जवळील रुग्णालयात दाखल केले. यानंतर शिक्षिकेच्या कुटुंबीयांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime case