Pulwama Encounter: मास्टर माईंड गाजी आणि कामरानचा आज खात्मा होणार?

Pulwama Encounter: मास्टर माईंड गाजी आणि कामरानचा आज खात्मा होणार?

१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यातील हल्लेखोर आदिल अहमद दार याला ज्यांनी प्रशिक्षण दिले होते त्या गाजी राशिद आणि कामरान या दोघा दहशतवाद्यांना भारतीत जवानांनी घेरले आहे.

  • Share this:

पुलवामा, 18 फेब्रुवारी: दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान येथे भारतीय सुरक्षा जवान आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्यात चकमक सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यातील हल्लेखोर आदिल अहमद दार याला ज्यांनी प्रशिक्षण दिले होते त्या गाजी राशिद आणि कामरान या दोघा दहशतवाद्यांना भारतीत जवानांनी घेरले आहे.

वाचा- LIVE अपडेट: पुलवामात दहशतवाद्यांसोबत चकमक; मेजरसह ४ जवान शहीद

पुलवामा हल्ल्यासाठी गेल्या महिन्यात पुंछ मार्गे जैश-ए-मोहम्मदचे 15 दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केली होती. या दहशतवाद्यांमध्ये कामरानचा देखील समावेश होता. काश्मीरमधील स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याने काही उपकरणे आणि अन्य स्फोटके देखील आणली होती.

कोण आहे गाजी रशिद

28 वर्षीय दहशतवादी राशिद दोन महिन्यांपूर्वी कुपवाडा मार्गे भारतात दाखल झाला होता. राशिद याने एका अफगाण युद्धात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. पाकिस्तान लष्कराच्या एका विशेष गटाने राशिदला प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तान लष्करामधील एका गटाकडून पाक व्याप्त काश्मीरमधील ऑपरेशनवर लक्ष ठेवले जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राशिदने पाकिस्तानमधील उत्तर-पश्चिम सीमा भागातील एका युद्धात सहभाग घेतला होता. अफगाणिस्तानमध्ये मुजाहिद्दीन असलेल्या गाजी राशिद हा आयईडी एक्सपर्ट होता. राशिद आणि त्याचा दोन साथीदारांनी डिसेंबरमध्ये भारतात घुसखोरी केली होती. त्यानंतर ते दक्षिण काश्मीरमध्ये लपले होते.

जैशने त्याचा कमांडर राशिदला काश्मीरमध्ये हल्ला करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती आता गुप्तचर विभागाने दिली आहे. काश्मीरमध्ये हल्ला करताना स्थानिक युवकाचा वापर केला जावा अशी जैशची योजना होती. गेल्या वर्षभरात दहशतवादाच्या मार्गावर केलेल्या अनेक युवकांना ऑपरेशन ऑलआउटमध्ये ठार मारण्यात आले आहे. यात जैशचा कमांडर मसूद अजहरच्या बहिणीचा मुलगा तल्हा आणि भावाचा मुलगा उस्मान या दोघांचा समावेश आहे. या दोघांना भारतीय लष्कराने दक्षिण काश्मीरमध्ये ठार मारले होते.

पाकिस्तानी नागरिक कामरान

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची पूर्ण योजना पाकिस्तानी नागरिक कामरानने आखली होती. कामरान जैशचा सदस्य आहे. तो दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, अवंतीपुरा आणि त्राल या परिसरात सक्रीय आहे. सुरुवातीच्या तपासानुसार कामरानने त्रालमधील मिदूरा येथे दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती.

Pulwama Encounter: भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना घेरले, ग्राऊंडवरून पहिला VIDEO

First published: February 18, 2019, 10:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading