Home /News /national /

Massive Fire: जम्मूतील मराठा वस्तीला भीषण आग; आगीत अनेक झोपड्या जळून खाक

Massive Fire: जम्मूतील मराठा वस्तीला भीषण आग; आगीत अनेक झोपड्या जळून खाक

जम्मू शहरातील मराठा वस्तीला (Fire at Maratha habitation in Jammu) भीषण आग लागली आहे. या भीषण आगीत असंख्य झोपड्या जळून खाक (fire burned down many huts) झाल्याची माहिती समोर येत आहे.

    जम्मू, 05 एप्रिल: जम्मू शहरातील मराठा वस्तीला (Fire at Maratha habitation in Jammu) अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. वस्तीला लागलेल्या आगीचं भीषण स्वरूप पाहता परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. या भीषण आगीत असंख्य झोपड्या जळून खाक (fire burned down many huts) झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची अद्याप पुष्टी करण्यात आली नसून या आगीत अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, मराठा वस्तीत लागलेल्या आगीने पूर्ण वस्तीला आपल्या भक्ष्यस्थानी घेतल्यानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. सुदैवाने या घटनेत अद्याप जीवितहानीची कोणती माहिती समोर आली नाही. पण या आगीने अनेकांचे संसार उद्धवस्त केले आहेत. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (हे वाचा - दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला; इस्लामिक स्टेटच्या कमांडरला जम्मूमध्ये अटक) आगीत नुकसान झालेल्या लोकांच्या मदतीसाठी स्थानिक आणि केंद्र सरकारने अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. कडक उन्हाळ्यात आता अनेकांना बेघर होण्याची वेळ आली आहे. घटनास्थळी दाखल झालेले अधिकारी घटनेचा पुढील तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Fire, Jammu kashmir

    पुढील बातम्या