कर्नाटक, 22 जानेवारी : कर्नाटकमधील(Karnataka) शिवमोगा (Shivamogga) जिल्ह्यात जिलेटीनचा प्रचंड मोठा स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात 8 जण जागीच ठार झाले आहे. तर अनेक जखमी झाले आहे. एका ट्रकमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटाचे तब्बल 50 किलोमीटर पर्यंत धक्के बसले. शेकडो घरांच्या काचा आणि दरवाजे फुटले आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूपासून 350 किमी दूर असलेल्या शिमोगा जिल्ह्यातील होनसोडू गावाजवळ गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. एका जिलेटीन कांड्याने भरलेल्या ट्रकमध्ये आणण्यात येत होता. एका खाणीमध्ये उत्खननादरम्यान स्फोटासाठी हा साठा मागवण्यात आला होता. परंतु, गुरुवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला.
हा स्फोट इतका भीषण आणि शक्तीशाली होता की, त्यामुळे शिवमोगा जवळील चिक्कमगलुरु आणि दावणगेरे जिल्ह्याला सुद्धा हादरे जाणवले. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, ऑफिस, घरांच्या खाचा फुटल्यात. रस्तांना भेगा सुद्धा पडल्यात. आकाश जैन नावाच्या एका ट्वीटर युझरने स्फोटाबद्दल एक फोटो शेअर केला आहे. शिवगोमा येथील कल्लुगंगुर-अअब्बलगेरे गावामध्ये जिलेटीनचा स्फोट झाला आहे. एका मायनिंगमध्ये हा स्फोट झाला आहे. यात स्फोटात अनेक कामगारांचा मृत्यू झाला आहे.
या शक्तीशाली स्फोटामुळे भूकंप झाल्याची जाणीव झाली, परंतु, प्रशासनाने असे वृत्त फेटाळून लावले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट हुनासोडू गावात झाला. एका ट्रकमधून जिलेटीनच्या कांड्या नेण्यात येत होत्या. त्याच दरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटात ट्रकमध्ये असलेल्या 8 कामगारांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय पथकांनी धाव घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka