ट्रेनमध्ये मसाज सेवा, आता सुमित्राताईंनीही केला विरोध

ट्रेनमध्ये मसाज सेवा, आता सुमित्राताईंनीही केला विरोध

मध्य प्रदेशमधल्या इंदूरमधून निघणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये मसाज देण्याच्या रेल्वेच्या योजनेला भाजपच्या नेत्यांकडून विरोध होतो आहे. माजी लोकसभा अध्यक्ष आणि भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांनीही पियुष गोयल यांना पत्र पाठवून मसाज सेवेला विरोध केला आहे.

  • Share this:

इंदूर, 15 जून : मध्य प्रदेशमधल्या इंदूरमधून निघणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये मसाज देण्याच्या रेल्वेच्या योजनेला भाजपच्या नेत्यांकडून विरोध होतो आहे. भाजपचे खासदार शंकर ललवानी यांनी या योजनेच्या विरोधात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना एक पत्र लिहिलं होतं.

आता माजी लोकसभा अध्यक्ष आणि भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांनीही पियुष गोयल यांना पत्र पाठवून मसाज सेवेला विरोध केला आहे. पश्चिम रेल्वेच्या रतलाम रेल्वे मंडळाने दिलेल्या या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी आहे का, असं सुमित्रा महाजन यांनी या पत्रात विचारलं आहे.

VIDEO: अभिनंदन यांची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानला भारतानं दिलं 'असं' उत्तर!

चालत्या रेल्वेगाडीत अशा प्रकारे मसाजची व्यवस्था कशी करणार, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मसाज देण्याच्या या सेवेमुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होऊ शकते, असंही सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे. इंदूरच्या रेल्वे स्टेशनवर मसाज पार्लर उघडण्याचाही यामध्ये प्रस्ताव आहे का, असा प्रश्नही सुमित्रा महाजन यांनी विचारला आहे.

भारतीय संस्कृतीच्या विरोधात ?

त्यांच्याआधी, इंदूरचे नवे भाजपचे खासदार शंकर ललवानी यांनीही या मसाज योजनेबदद्ल केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना एक पत्र लिहिलं आहे. मसाज देण्याची ही सेवा भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. अशी दर्जाहीन सेवा रेल्वेने देऊ नये, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. रेल्वे मंत्रालयाने जनभावना लक्षात घेऊन या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं त्यांनी म्हटलं होतं.

39 गाड्यांमध्ये देणार मसाज सेवा

इंदूरहून निघणाऱ्या 39 रेल्वेगाड्यांमध्ये मसाजची सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे. ही सेवा नेमकी कधी सुरू होणार हे मात्र रेल्वे मंत्रालयाने सांगितलेलं नाही.

अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, या मसाज सेवेचं कंत्राट एका खाजगी संस्थेला देण्यात आलं आहे. याद्वारे रेल्वेच्या उत्पन्नात दरवर्षी 20 लाख रुपयांची वाढ होईल, असा अंदाज आहे.

====================================================================================================

World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर पावसाचं ग्रहण

First published: June 15, 2019, 5:53 PM IST

ताज्या बातम्या