Home /News /national /

मोदींच्या निर्णयानंतर राहुल गांधींनी सांगितला कोरोनाला हरवण्याचा मार्ग, पण व्यक्त केली 'ही' भीती

मोदींच्या निर्णयानंतर राहुल गांधींनी सांगितला कोरोनाला हरवण्याचा मार्ग, पण व्यक्त केली 'ही' भीती

राहुल गांधी यांनी कोरोनाला हरवण्यासाठी दुसराच मार्ग सांगितला आहे. तसंच एक भीतीही व्यक्त केली आहे.

    नवी दिल्ली, 14 एप्रिल : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा भारतातही विळखा पडू लागला आहे. देशभरातील विविध राज्यात वाढू लागलेला कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मात्र 21 दिवसांच्या लॉकडाऊनंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने लॉकडाऊनच्या कालावधीत 3 मेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला आहे. मात्र काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कोरोनाला हरवण्यासाठी दुसराच मार्ग सांगितला आहे. तसंच एक भीतीही व्यक्त केली आहे. असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 'भारताने टेस्टिंग किट्स खरेदी कऱण्यास उशीर केला आणि आता त्याची मोठी कमतरता भासत आहे. 10 लाख लोकांमागे भारतात केवळ 149 लोकांची चाचणी करण्यात येत असल्याने आपण कमी चाचण्या करणाऱ्या देशांच्या पंक्तीत गेलो आहोत. मोठ्या प्रमाणात लोकांची कोरोना चाचणी करणे, हाच कोरोनाला हरवण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. मात्र आता आपण या खेळात कुठेच नाही,' अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन वाढवताना काय म्हणाले नरेंद्र मोदी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याचवेळी देशातील काही भागात 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. '20 एप्रिलनंतर ज्या भागात कोरोनाचा प्रभाव कमी असेल तिथे काही जीवनावश्यक सेवांसाठी शिथिलता आणली जाईल...मात्र त्यालाही काही नियम व अटी असतील,' अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. 'आजपासून 20 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत. सर्व गाव, तालुका, जिल्हे यांचं मुल्यांकन करणार...त्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी किती काळजी घेतली हे तापसलं जाणार आहे. कोरोनाचा प्रभाव कमी असणाऱ्या भागात 20 एप्रिलपासून शिथिलता आणण्याचा निर्णय गरिबांकडे बघून घेण्यात आला,' असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Pm narenda modi, Rahul gandhi

    पुढील बातम्या