रावळपिंडीतील पाकिस्तानी लष्कराच्या रूग्णालयात बॉम्बस्फोट; मसूद अजहर जखमी

रावळपिंडीतील पाकिस्तानी लष्कराच्या रूग्णालयात बॉम्बस्फोट; मसूद अजहर जखमी

MASOOD AZHAR : रावळपिंडीमध्ये लष्कराच्या रूग्णालयात स्फोट झाला त्यामध्ये मसूद अजहर जखमी झाला आहे.

  • Share this:

रावळपिंडी, 24 जून : रावळपिंडी येथे लष्कराच्या रूग्णालयात झालेल्या बॉम्बस्फोटात 10 जण जखमी झाले आहेत. रविवारी झालेल्या या स्फोटाची दृश्य आता समाजमाध्यमांमधून पुढे आली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मीडियाला या स्फोटाचं वृत्तांकन करण्यास पाकिस्तानी लष्करानं मनाई केली आहे. पण, त्यानंतर देखील सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून स्फोटाची दृश्य समोर आली आहेत. स्फोट झालेल्या रूग्णालयात संयुक्त राष्ट्रसंघानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेला आणि जैश – ए – मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरवर उपचार सुरू होते. या स्फोटात मसूद अजहर हा जखमी झाला आहे. अशी माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे या स्फोटाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. दरम्यान जखमींना पुढील उपचारासाठी इमर्जन्सी वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. पण, मीडियाला या स्फोटाचं वृत्तांकन करण्यास मनाई केल्यानं अधिक माहिती समोर आलेली नाही. पण, त्यानंतर देखील विविध समाजमाध्यमांच्या माध्यमातून स्फोटाचे व्हिडीओ समोर येत आहेत.

मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. जैश – ए – मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मसूद अझहर याच दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. त्यानंतर भारतानं सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघात मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं. सध्या मसूद अजहर हा पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे. रावळपिंडीमध्ये लष्कराच्या ज्या रूग्णालयात स्फोट झाला त्या ठिकाणी मजूद अजहरवर उपचार सुरू आहेत.

VIRAL FACT: पिसाळलेल्या कुत्र्याचा 'तो' व्हिडिओ मुंबईतला? हे आहे सत्य

First published: June 24, 2019, 9:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading