AIR STRIKE पासून अभिनंदनच्या सुटकेपर्यंत... आठवड्याचा क्लायमॅक्स साधणारी बातमी आली कशी?

गेले काही दिवस सुरू असणाऱ्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी रविवारी आली. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. हा या आठवड्याचा क्लायमॅक्स म्हणता येईल. या क्लायमॅक्सच्या आधी नेमकं काय काय आणि कधी झालं याचा धावता आढावा...

  • Share this:

गेले काही दिवस सुरू असणाऱ्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी रविवारी आली. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. हा या आठवड्याचा क्लायमॅक्स म्हणता येईल.

14 फेब्रुवारी 2019 ला काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आत्मघाती हल्ला केला. यात 40 हून अधिक जवान शहीद झाले.

भारताने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या जैश ए मोहम्मद या संघटनेच्या प्रशिक्षण स्थळावर 26 फेब्रुवारीला हवाई हल्ला केला. भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज लढाऊ विमानांनी 1 हजार किलो बॉम्ब फेकले. यात दहशतवाद्यांचा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.

भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने काश्मीरमध्ये नौशेरा, आखनूर भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्याचबरोबर पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अरब अमिरातीने आयोजित केलेल्या ओआयसीमध्ये भारताला सहभागी होऊ देऊ नये असं म्हटलं होतं.

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारीला पाकिस्तानने एफ16 विमान भारताच्या हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन भारतीय मिग 21 आणि पाकिस्तानचे एफ 16 विमान कोसळले.

पाकिस्तानने पहिल्यांदा भारतीय हवाई दलाच्या दोन पायलटना ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी घुमजाव करत एकच पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे सांगितले होते.

पाकिस्तानने भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचा व्हिडिओदेखील व्हायरल केला होता. त्यानंतर भारताने एक पायलट बेपत्ता असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खाम यांनी एफ 16 विमान भारतीय हद्दीत घुसवल्याचे समर्थन केलं होतं. त्याचबरोबर या मुद्द्यावर युद्ध नाही तर दोन्ही देशांनी एकत्र य़ेऊन चर्चा करायला हवी असं म्हटलं.

28 फेब्रुवारीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या अभिनंदन वर्तमान यांना शुक्रवारी सोडणार असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर भारताच्या तीनही दल प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानने भारताविरुद्ध एफ 16 वापरल्याचे पुरावे असल्याचं सांगितलं.

दरम्यान भारतात अभिनंदन वर्तमान कसे आणि कधी परत येणार याची वाट देशवासिय बघत होते. 1 मार्चला दिवसभर लोक बॉर्डरवर त्यांच्या भारतात परतण्याकडे डोळे लावून बसले होते. अखेर रात्री 9:15 मिनिटांनी अभिनंदन यांनी वाघा-अटारी सीमा पार करत भारतात प्रवेश केला.

भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्तमान शुक्रवारी रात्री पाकिस्तानमधून भारतात परतले. तब्बल 58 तासांहून जास्त वेळ पाकच्या ताब्यात राहिलेले अभिनंदन वाघा-अटारी सीमेवरून भारतात आल्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

अभिनंदन भारतात परतत असतानाच पकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने ही आगळीक केली.

२ मार्चला जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये आयईडी स्फोट झाला. पुलवामातील हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा आयइडी हल्ला. मात्र यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतरही अशा कुरापती सुरूच आहेत.

3 मार्चला सकाळी काश्मीर मधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत दोन सीआरपीएफचे जवान आणि दोन काश्मीर पोलिस शहीद झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2019 10:10 AM IST

ताज्या बातम्या