भारताला मोठे यश, मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित

जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने हा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 07:05 PM IST

भारताला मोठे यश, मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित

न्यूयॉर्क, 01 मे: जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारताच्या राजनैतिक रणनीतीला मोठा विजय झाल्याचे मानले जात आहे. फ्रान्सने हा हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला चीनने विरोध केला होता. पण त्यानंतर चीनने हा विरोध कमी केला होता. अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या निर्णयाला 151 देशांनी पाठिंबा दिला आहे.संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड तसेच पुलवामा हल्ल्यामागे देखील अजहरचा हात होता. विशेष म्हणजे इतके दिवस या बाबत चीनने नकाधिकार वापरला होता. मात्र भारताच्या राजनैतिक रणनीताला मोठे यश मिळाले आहे. चीनने याबाबतचा आपला विरोध मागे घेतला आहे. आता अजहर बाबत पाकिस्तान कोणता निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागेल. अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याने त्याची सर्व संपत्ती जप्त केली जाईल.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी भारताने दबाव टाकला होता. याला चीनने अनेकदा विरोध केला होता. यासंदर्भातील फ्रान्सच्या प्रस्तावावर चीनने व्होटोचा अधिकार वापरला होता. त्यावर अमेरिकेसह जगभरातील अन्य देशांनी चीनवर टीका देखील केली होती.

Loading...VIDEO : गडचिरोलीत जिथे स्फोट घडला 'त्या' परिसरात पोहोचला न्यूज18 लोकमतचा प्रतिनिधी, संपूर्ण आढावाबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 06:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...