'मसूद अझहरमुळे शांततेला धोका', भारताला मिळाली अमेरिकेची साथ

'मसूद अझहरमुळे शांततेला धोका', भारताला मिळाली अमेरिकेची साथ

मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित केलं जावं, अशी मागणी वारंवार भारताकडून केली जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,13 मार्च : कुख्यात दहशतवादी 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतासोबत आता अमेरिकानंदेखील आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचं दिसत आहे. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित केलं जावं, अशी मागणी वारंवार भारताकडून केली जात आहे.   अमेरिकेची साथ मिळत असल्यानं भारताच्या प्रयत्नांना यश येऊ शकते. मात्र, दुसरीकडे या प्रकरणात चीन पुन्हा खोडा घालण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पण दहशतवादाविरोधातील मोहिमेत भारतासोबत आहोत, असे अमेरिकेनं अनेकदा जाहिररित्या सांगितले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना अमेरिकेने म्हटलं आहे की,'जैश-ए-मोहम्मद ही एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे आणि मसूद अझहर या संघटेनाचा म्होरक्या आहे. त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं गेलं पाहिजे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी जे पाऊल उचललं आहे. ते फसलं तर शांततेला धोका पोहोचू शकतो.

चीनच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव सादर केला आहे. यावर  आक्षेप नोंदवण्यासाठीची मुदत बुधवारी संपणार आहे. या घडामोडींमध्ये  चीनच्या भूमिकेवर सर्वांचंच लक्ष आहे. कारण याआधी अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यामध्ये चीनने अधिकाराचा वापर करत खोडा घातला होता.

मसूदविरोधातील पुरावे पाकिस्तानकडे सुपूर्द

भारत सरकारने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आरोपी आणि जैश-ए-मोहम्मद म्होरक्या मसूद अझहरविरोधातील सर्व पुराव्यासंहीत पाकिस्तानला डॉजियर सोपवलं आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झालेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या(सीआरपीएफ)ताफ्यावर हा भ्याड हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळेस सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

First published: March 13, 2019, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading