VIDEO: JNUमध्ये चेहरा लपवून आलेल्या गुंडांनी 30 मिनिटं असा घातला धुडगूस

VIDEO: JNUमध्ये चेहरा लपवून आलेल्या गुंडांनी 30 मिनिटं असा घातला धुडगूस

तर घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांना दिलेत. रात्री उशीरा काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी एम्समध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

  • Share this:

नवी दिल्ली 05 जानेवारी : चळवळींसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजधानी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) आज पुन्हा एकदा राडा झाला. गेल्या काही दिवसांपासून JNUमध्ये फी वाढी विरोधात आंदोलन सुरू आहे. त्यातच CAA आणि NRC विरोधात आंदोलन पेटल्याने वातावरण तापलेलं होतं. अशी परिस्थिती असताना आज रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. डाव्या संघटनांनी अभाविपवर(ABVP) आरोप केलेत तर अभाविपने(ABVP) डाव्या विद्यार्थी संघटनांवर आरोप केले आहेत. दोन्ही संघटनांनी आपले विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप केलाय. परिस्थिती स्फोटक बनल्याने प्रशासनाने दिल्ली पोलिसांना विद्यापीठाच्या आवारात पाचारण केलं. पोलिसांनी परिसरात फ्लॅग मार्च करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र तोंड झाकून आलेले ते गुंड कोण होते हे शोधण्याचं आवाहन आता पोलिसां पुढे आहे.

या दोन गटात भांडण सुरू असताना तरुणांचा एक गट हा तोंडाला रुमाल बांधून या वादात उतरला आणि त्यांनी हातात रॉड घेऊन विद्यार्थ्यांवर हल्ला करायला सुरूवात केली. त्यात अनेक जण जखमी झालेत. विद्यार्थ्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलंय. त्यानंतर JNUमधले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात विद्यार्थी हातात रॉड आणि लोखंडी सळ्या घेऊन फिरताना दिसत आहेत. तब्बल 30 मिनिटं हा धुडगूस सुरू होता. पोलीस आल्यानंतरच परिस्थिती शांत झाली.

दरम्यान विविध मान्यवरांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय. तर घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांना दिलेत. रात्री उशीरा काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी एम्समध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

दरम्यान, हल्लेखोर अद्याप ओळखू शकले नाहीत. या विकासाबद्दल दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांकडे तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही घटनेवर भाष्य केले. केजरीवाल यांनी, “जेएनयूमधील हिंसाचाराबद्दल मला खूप आश्चर्य वाटले. विद्यार्थ्यांवर निर्दयपणे हल्ला करण्यात आला. पोलिसांनी हिंसाचार त्वरित थांबवावा व शांतता प्रस्थापित करावी. आमचे विद्यार्थी जर विद्यापीठाच्या परिसरात सुरक्षित नसतील तर देश पुढे कसा जाईल?”, असे विधान केले आहे.

दरम्यान, दिल्ली सरकारच्या वतीनं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात सात रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या असून स्टँडबाईवर 10 रुग्णवाहिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2020 10:47 PM IST

ताज्या बातम्या