'किडनॅपिंग कार'चा प्रवास थांबला, मारूतीकडून 'ओमनी'ला 'ब्रेक'!

चित्रपटांमध्ये कुणाचंही अपहरण करण्याचा सीन जर आला तर तिथे ओमनी ही गाडी सहज पाहण्यास मिळत होती. त्यामुळे ओमनीला 'किडनॅपिंग कार' म्हणून वेगळी ओळखही मिळाली होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2019 08:58 PM IST

'किडनॅपिंग कार'चा प्रवास थांबला, मारूतीकडून 'ओमनी'ला 'ब्रेक'!

19 च्या दशकात चित्रपटामधून 'किडनॅपिंग कार' म्हणून ज्या गाडीला ओळख मिळाली अखेरच तिचा प्रवास आता थांबला आहे. मारूती सुझुकीने ओमनी कारचं उत्पादन बंद  करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून रस्त्यावर धावणारी ओमनी कार आता हद्दपार होणार आहे.

  मारुती सुझकीने आज ओमनी कार बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, या कारची आताही विक्री चांगल्याप्रकारे सुरू होती. तरीही ओमनीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

    मारूतीने जेव्हा भारतात उद्योगाला सुरुवात केली होती. तेव्हा सुरुवातील मारुती 800 ही कार लाँच केली होती. त्यानंतर 1984मध्ये ओमनी लाँच करण्यात आली होती.

Loading...

  मारुती 800 मध्ये 4 ते ५ लोकं सहज बसू शकत होती. परंतु,  एखाद्या कुटुंबातील जास्त सदस्य असतील तर त्यांच्यासाठी फॅमिली कार म्हणून ओमनी लाँच करण्यात आली होती. त्यामुळे अल्पावधीतच ओमनी भारतीयांच्या पसंतीत उतरली.

  एवढंच नाहीतर, ओमनीमध्ये जास्त जागा उपलब्ध असल्यामुळे छोटे व्यापारी सामनाची ने आण करण्यासाठीही या कारचा वापर करत होते. एवढंच नाहीतर काही जण तर या कारचा चालते फिरते दुकान म्हणूनही वापर करत होते.

  विशेष म्हणजे, चित्रपटांमध्ये कुणाचंही अपहरण करण्याची सीन जर आला तर तिथे ओमनी ही गाडी सहज पाहण्यास मिळत होती. त्यामुळे ओमनीला किडनॅपिंग कार म्हणून वेगळी ओळखही मिळाली होती.

विशेष म्हणजे, चित्रपटांमध्ये कुणाचंही अपहरण करण्याचा सीन जर आला तर तिथे ओमनी ही गाडी सहज पाहण्यास मिळत होती. त्यामुळे ओमनीला किडनॅपिंग कार म्हणून वेगळी ओळखही मिळाली होती.

 काही वर्षांपूर्वी मारूती सुझकीने इकोही कार लाँच केली होती. इकोही ओमनीच्या प्लॅटफाॅर्मवर तयार करण्यात आली. या दोन्ही गाड्यांमध्ये फक्त डिझाईनचा तेवढा फरक होता.

  आता मारूती सुझकीने इको या कारचे नवे सुधारीत माॅडेल लाँच करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे ओमनीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2019 08:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...