ऋषिकेश, 17 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला भागात पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात बीएसएफचे सब इन्स्पेक्टर राकेश डोभाल शहीद झाले. शहीद राकेश डोभाल यांचे पार्थिव सोमवारी त्यांची राहत्या घरी पोहचले. डोभाल यांचे पार्थिव पाहून उपस्थित प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणवले होते. मात्र डोभाल यांच्या 10 वर्षांच्या लेकीनं सर्वांना थक्क केलं, डोळ्यात पाणी असताना या चिमुरडीनं धैर्य दाखवलं.
आपल्या वडिलांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या या लेकीनं शहीद राकेश डोभाल यांचं पार्थिव घेऊन आलेल्या जवानांना मिठी मारली. एवढेच नाही तर मोठ्या धीरानं तीने आजीला सांगितले की...आजी रडू नको... हे काका आपलं रक्षण करतात. चिंता करू नको रडू नको. वडिलांना आदरांजली वाहताना ती म्हणाली की, मी वडिलांप्रमाणे सैन्यात जाणार...वंदे मातरम्…भारत माता की जय. या 10 वर्षीय लेकीनं दाखवलेल्या या धैर्याचं कौतुक संपूर्ण देश करत आहे.
वाचा-नेहरूंना अपेक्षित होती पाकिस्तानकडून मदत तेही चीनवरुद्ध; त्या वेळी कुठे चुकलं?
मेरी तो ईश्वर से यही प्रार्थना है कि मां भारती के हर घर-परिवार में नित्या डोभाल जैसी बेटी जन्म लेती रहें। इस नन्ही परी के हौंसले, जज्बे और देशप्रेम के भाव को मैं दिल से सलाम करता हूं। यह वीर पुत्री जिसके जांबाज़ पिता शहीद स्वर्गीय श्री राकेश डोभाल जी ने मातृभूमि की रक्षा हेतु pic.twitter.com/7nwOk6e1qO
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) November 16, 2020
वाचा-जगातील सर्वात मोठ्या व्यापार करारामध्ये भारत का नाही झाला सामील?
एकीकडे देशात दिवाळी सण साजरा होत असताना शुक्रवारी पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर ते गुरेझ सेक्टरपर्यंत नियंत्रण रेषेच्या बाजूने अनेक ठिकाणी युद्धबंदीचे उल्लंघन केले. यावेळी गोळीबारात चार सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. तसेच आणखी सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. श्रीनगरमध्ये संरक्षण प्रवक्ते कर्नल राजेश कालिया म्हणाले की, पाकिस्तानी सैनिकांनी मोर्टारसह अनेक शस्त्रे घेऊन गोळ्या झाडल्या. मात्र भारतीय सैनिकांनीही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
वाचा-JNU चं नामांतर! भाजपच्या सरचिटणीसांनी केली वादग्रस्त मागणी; नेहरूंऐवजी विवेकानंद
पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात बीएसएफचे एक उपनिरीक्षक, तीन लष्करी जवान शहीद झाले आहेत. तर, सहा नागरिक ठार झाले. आठ नागरिक आणि चार सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.