मराठी बातम्या /बातम्या /देश /

1984 मध्ये शहीद झालेला जवान; 38 वर्षांनंतर बर्फाखाली सापडला मृतदेह, आज कुटुंबीयांचा अखेरचा निरोप घेणार

1984 मध्ये शहीद झालेला जवान; 38 वर्षांनंतर बर्फाखाली सापडला मृतदेह, आज कुटुंबीयांचा अखेरचा निरोप घेणार

1984 मध्ये त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांचा मृतदेह सापडला नसल्याची माहिती देण्यात आली होती (. हिमवादळाच्या तडाख्यात ते शहीद झाले होते. (Buried in Snow Storm)

    नवी दिल्ली 15 ऑगस्ट : सियाचीनमध्ये 1984 मध्ये शहीद झालेले 19 कुमाऊ रेजिमेंटमधील सैनिक चंद्रशेखर हर्बोला यांचं पार्थिव 38 वर्षांनी त्यांच्या घरी पोहोचणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सियाचीनमध्ये बर्फाच्या वादळाच्या तडाख्यात 19 जण अडकले होते. त्यानंतर शोध मोहिमेदरम्यान 14 जवानांचे मृतदेह सापडले, तर 5 जणांचे मृतदेह सापडले नव्हते. त्यात शहीद लान्स नायक चंद्रशेखर हर्बोला यांच्या नावाचाही समावेश होता. India@75: 15 ऑगस्ट 1947 हा दिवस इतिहासाच्या पानात कसा नोंदवला गेला? एका भाषणाने कशी बदलली दिशा? 1984 मध्ये त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यांचा मृतदेह सापडला नसल्याची माहिती देण्यात आली होती. हिमवादळाच्या तडाख्यात ते शहीद झाले होते. मात्र, काळ असा बदलला की आता 38 वर्षानंतर शहीद चंद्रशेखर हेर्बोला यांचं पार्थिव त्यांच्या घरी पोहोचणार आहे. 19 कुमाऊ रेजिमेंटमध्ये तैनात लान्स नायक चंद्रशेखर 29 मे 1984 रोजी सियाचीनमधील ऑपरेशन मेघदूत दरम्यान शहीद झाले होते. त्या बर्फाच्या वादळात ऑपरेशन मेघदूतमधील 19 जण गाडले गेले होते, त्यापैकी 14 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मात्र, शोध मोहिमेदरम्यान पाच जवानांचे मृतदेह सापडले नाहीत. त्यानंतर लष्कराने हिमवादळामुळे चंद्रशेखर शहीद झाल्याची बातमी त्यांच्या घरी दिली होती. स्वातंत्र्यदिनाआधी दहशतवाद्यांचा पुन्हा कुरापती, जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला आता 38 वर्षांनंतर त्यांचा मृतदेह सापडल्याची बातमी समजताच जुन्या पुसट आठवणी ताज्या झाल्या. कुटुंबातील एक सदस्य गमावल्याने घरातील व्यक्तींना दु:ख झालं असलं तरी देशाची सेवा करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या चंद्रशेखर यांचा त्यांना अभिमान आहे. चंद्रशेखर यांचे पार्थिव आज म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी पोहोचणार आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Independence day

    पुढील बातम्या