मराठी बातम्या /बातम्या /देश /

लग्नाच्या वाढदिवशी सासरीच झाला सुनेचा शेवट; पुण्यात राहणारा पतीही अनभिज्ञ

लग्नाच्या वाढदिवशी सासरीच झाला सुनेचा शेवट; पुण्यात राहणारा पतीही अनभिज्ञ

पाच वर्षांपूर्वी पूजा देवी आणि अंकित पटेलचे लग्न झाले होते. त्यांना एक 3 वर्षाचा मुलगाही आहे.

पाच वर्षांपूर्वी पूजा देवी आणि अंकित पटेलचे लग्न झाले होते. त्यांना एक 3 वर्षाचा मुलगाही आहे.

पाच वर्षांपूर्वी पूजा देवी आणि अंकित पटेलचे लग्न झाले होते. त्यांना एक 3 वर्षाचा मुलगाही आहे.

  गोपाळगंज, 9 जुलै : बिहारमधील गोपाळगंज (Gopalganj Bihar) जिल्ह्यात लग्नाच्या वाढदिवसाच्या रात्री एका विवाहित तरुणीची हत्या करण्यात आली. (Murder on Marriage Anniversary) विजयपूर पोलीस स्टेशन हद्दीतील महुआवा गावात ही घटना घडली. पूजा देवी असे 27 वर्षीय मृत विवाहित तरुणीचे नाव आहे. तिच्या पतीचे नाव अंकित पटेल असे आहे. पूजा देवीच्या हत्येचा आरोप तिच्या सासरच्या लोकांवर लावण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण -  मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी पूजा देवी आणि अंकित पटेलचे लग्न (Marriage) झाले होते. त्यांना एक 3 वर्षाचा मुलगाही आहे. पूजा हिचा पती अंकित हा पुण्यात (Pune) नोकरी करतो. मृताचा भाऊ अरविंद कुमार यांनी आरोप केला आहे की, शुक्रवारी रात्री पूजाला सासरच्या मंडळींनी जोरदार माराहण करत तिच्या हत्या केली. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न सुरू होते, तोपर्यंत माहिती मिळताच तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तत्काळ विजयपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मूत विवाहित तरुणी पूजा हिच्या शरीरावर अनेक ठिकाणी खोल जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत. तसेच चेहऱ्यावरही गंभीर जखमा आहेत. घटनेनंतर परिस्थिती पाहता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला. हेही वाचा - मुलीनेच प्रियकराला दिली वडिलांच्या हत्येची सुपारी; धक्कादायक कारण आलं समोर
  तर पुण्यातील पती अंकित पटेलही पत्नीच्या हत्येची बातमी मिळताच गोपाळगंजला रवाना झाला आहे. या हत्येचा आरोप मृताच्या सासरच्या लोकांवर केला आहे. या प्रकरणी हथुआचे एसडीपीओ नरेश कुमार म्हणाले की, पोलीस या प्रकरणी एफआयआर नोंदवून कारवाई करत आहेत. घटनेनंतर सर्व आरोपी घर सोडून फरार झाले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bihar, Crime news

  पुढील बातम्या