Home /News /national /

विवाहित असतानाही सहमतीनं इतरांशी संबंध ठेवणं हा गुन्हा नाही, हायकोर्टाचा लक्षवेधी निकाल

विवाहित असतानाही सहमतीनं इतरांशी संबंध ठेवणं हा गुन्हा नाही, हायकोर्टाचा लक्षवेधी निकाल

एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं असेल (Married person) तरी त्याने इतर जोडीदाराशी (partner) परस्पर सहमतीने संबंध (sexual relation) ठेवणे, हा गुन्हा (Crime) होत नाही, असा निकाल हायकोर्टाने (High Court) दिला आहे.

    चंदिगढ, 8 सप्टेंबर : एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं असेल (Married person) तरी त्याने इतर जोडीदाराशी (partner) परस्पर सहमतीने संबंध (sexual relation) ठेवणे, हा गुन्हा (Crime) होत नाही, असा निकाल हायकोर्टाने (High Court) दिला आहे. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात एका प्रकरणाच्या सुनावणीत हे मत नोंदवण्यात आलं असून अशा प्रकारात जोडप्याला सुरक्षा मागण्याचा अधिकार असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे. काय आहे प्रकरण? घटस्फोटासाठी अर्ज केलेला एक तरुण सध्या दुसऱ्या तरुणीसोबत राहत असून पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा त्याने केला आहे. त्यामुळे आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली आहे. यावर न्यायालयाने त्याला सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी वकिलांनी केला विरोध लग्न झालेली व्यक्ती जर आपल्या जोडीदाराशिवाय इतर कुणाशी लैंगिक संबंध ठेवत असेल, तर अशा व्यक्तींना सुरक्षा देण्याची गरज नसल्याचा निकाल यापूर्वी अलाहाबाद हायकोर्टाने दिला होता. सरकारी वकिलांनी या निकालाचा संदर्भ पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात दिला. मात्र त्या निकालाशी आपण सहमत नसून सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड विधानाचं कलम 497 हे असंवैधानिक असल्याचं म्हटल्याचा संदर्भ हायकोर्टाने दिला. हे वाचा - शिवसेना नेत्याच्या बंगल्यात बिबट्याचा वावर; घुसखोरी करत कुत्र्याला केलं भक्ष्य एखाद्या प्रौढ व्यक्तीने परस्पर सहमतीने इतर व्यक्तींशी संबंध ठेवणे, हा गुन्हा नसून अशा व्यक्तींच्या जीवाला धोका असेल, तर सुरक्षा पुरवणे योग्यच असल्याचं मत हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. या केसमधील तरुणाने घटस्फोटासाठी अर्ज केला असून त्याचा निकाल प्रलंबित आहे. मात्र सध्या तो सहमतीने वेगळ्या तरुणीसोबत राहत असून त्याला सुरक्षा नाकारण्यासाठी कुठलेही कायदेशीर कारण दिसत नसल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. कोर्टाच्या या निर्णय़ावर सध्या समाजातून उलटसुलट प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: High Court, Women extramarital affair

    पुढील बातम्या