Home /News /national /

कुटुंबाविरूद्ध जाऊन केला प्रेमविवाह, आता पत्नी गेली सोडून; दोन महिन्याच्या तान्हुल्याला घेऊन फिरतोय बाप

कुटुंबाविरूद्ध जाऊन केला प्रेमविवाह, आता पत्नी गेली सोडून; दोन महिन्याच्या तान्हुल्याला घेऊन फिरतोय बाप

फोटो सौजन्य-जागरण

फोटो सौजन्य-जागरण

शेवटी तो बापच! हातात दोन महिन्यांचं बाळ सोडून गेली पत्नी, तान्हुल्याला घेऊन फिरतोय बाप.

    यमुनानगर, 09 नोव्हेंबर : आई...तिच्या कंबरेवर एक मुलं असं चित्र सर्रास दिसतं. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून हरियाणात एक बाप दोन महिन्यांच्या नवजात मुलीला घेऊन वणवण भटकत आहेत. दोन महिन्यांपूर्वी मुलाला जन्म दिल्यानंतर महिला पती आणि बाळ दोघांना सोडून गेली. खरं तर, तरूणानं आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध एका महिलेशी लग्न केले होते. दोघांचे कोर्ट मॅरेज झाले होते. मात्र आता त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्यामुळे बाळाला दूध पाजण्यासाठी एक बाप वणवण भटकत आहे. सध्या या तरुणाची तक्ररा पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्या पत्नीला बोलावले. पोलिसांसमोर महिलेने आपल्या पतीबरोबर राहण्यास नकार दिला आणि मुलाला सांभाळण्यासही नकार दिला. वाचा-हात, पाय तोडून टाकू, नाही तर थेट स्मशानात’ भाजपच्या नेत्याची जाहीर धमकी 2019 मनीषनं एका तरुणीशी कुटुंबावरुद्ध जाऊन कोर्टात लग्न केले होते. त्यांची दोन्ही कुटुंबे या नात्याविरूद्ध होती. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. मात्र मुलगी सज्ञान असल्यामुळे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर मनीष आणि ही तरुणी हरियाणात राहू लागले. दोन महिन्यांपूर्वी त्यांना मुलगी झाली. सर्व काही नीट सुरू असताना दोन दिवसांपूर्वी मनीषने घर बदलले. यात त्याची पत्नी आपले कपडे व कागदपत्रं घेऊन घराबाहेर पडली. वाचा-वीज नाही, पोटभर अन्न नाही; 5 वर्षांपर्यंत मुलाने वृद्ध आई-बापाला केलं कैद सासरच्यांवर केले आरोप मनीषनं सांगितले की, त्याचा पत्नीशी वाद नव्हता. दोघेही आनंदानं राहत होते. गुरुवारी संध्याकाळी पत्नी घराबाहेर पडली. नोकरीच्या बहाण्याने सासरच्यांनी तिला पळवून घेऊन गेले असल्याचा आरोप मनीषनं केला. मात्र दोन दिवस तिचा शोध घेतल्यानंतर त्यानं पोलिसांत तक्रार केली. यानंतर पोलिसांनी तरुणीला बोलावलं, तिने बाळाकडे पाहिलेही नाही. तसेच, तिने पतीबरोबर राहण्यास आणि मुलाला सांभाळण्यास नकार दिला. मनीष म्हणतो की आता कोणीही त्याच्याबरोबर नाही. त्यामुळे दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन मनीष वणवण भटकत आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या