मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाचा घेतला भलताचं धसका; वधूला आणायला दुचाकीवरून एकटाच आला नवरदेव

कोरोनाचा घेतला भलताचं धसका; वधूला आणायला दुचाकीवरून एकटाच आला नवरदेव

एका नवरदेवानं कोरोना विषाणूचा भलताचं धसका घेतल्याचं समोर आलं आहे. तो नवरीला घरी आणण्यासाठी दुचाकीवरून एकटाच (groom came alone to fetch bride) निघाला आहे.

एका नवरदेवानं कोरोना विषाणूचा भलताचं धसका घेतल्याचं समोर आलं आहे. तो नवरीला घरी आणण्यासाठी दुचाकीवरून एकटाच (groom came alone to fetch bride) निघाला आहे.

एका नवरदेवानं कोरोना विषाणूचा भलताचं धसका घेतल्याचं समोर आलं आहे. तो नवरीला घरी आणण्यासाठी दुचाकीवरून एकटाच (groom came alone to fetch bride) निघाला आहे.

  • Published by:  News18 Desk

बलरामपूर, 28 एप्रिल: सध्या देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक राज्यांत लॉकडाऊनची (Corona lockdown) घोषणा करण्यात आली आहे. अशा स्थितीत लग्न करण्यासाठी (Marriages During Corona Pandemic) अनेक ठिकाणी जास्तीत जास्त 50 लोकांना तर काही ठिकाणी फक्त 25 च लोकांना एकत्र येण्याची मुभा सरकारकडून देण्यात आली आहे. असं असताना एका नवरदेवानं कोरोना विषाणूचा भलताचं धसका घेतल्याचं समोर आलं आहे. तो नवरीला घरी आणण्यासाठी दुचाकीवरून एकटाच (groom came alone to fetch bride) निघाला आहे. दरम्यान पोलिसांनी अडवून विचारपूस केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होतं आहे.

संबंधित घटना छत्तीसगड राज्यातील बलरामपूर येथील असून हा नवरदेव झारखंड राज्यातील रहिवासी आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या छत्तीसगडमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. अशा स्थितीत एक युवक आपल्या लग्नासाठी वराच्या पोशाख चढवून, हेल्मेट परिधान करून एकटाच दुचाकीवरून लग्नासाठी आला होता. अशा पद्धतीनं लग्नाला एकट्या जाणाऱ्या वराला पाहून पोलिस पथकानं रामानुजगंजच्या सीमेवर त्याला अडवलं आणि त्याची कहाणी ऐकून पोलिसांनाही आश्चर्य झालं आहे.

हे वाचा-लॉकडाऊनमध्येही तळीरामांची चंगळ; पुण्यात फेसबुकवरून होतेय दारूची विक्री

संबंधित युवकाचं बलरामपूर रामानुजगंज जिल्ह्यातील सणावल याठिकाणी लग्न होणार होतं. सर्व काही आयोजन करण्यात आलं होतं. पण लॉकडाऊनमुळे लग्नाची वरात काढणं शक्य नसल्यानं त्याने वऱ्हाडींशिवाय एकटंच लग्नाता जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी पोलिसांनी अडवल्यानंतर त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, हिंदू परंपरेनुसार लग्नात किमान पाच लोकं आवश्यक आहेत. त्यामुळे आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून घेतो, तू तुझ्या कुटुंबातील किमान पाच जणांना घेऊन जाऊ शकतोस.

हे वाचा- धन्य! PPE किट घालून अखेर लग्न उरकलंच, एक दिवस आधी नवरदेवाचा कोरोना रिपोर्ट होता Positive

पण संबंधित नवऱ्यानं पोलिसांच काहीही ऐकलं नाही. त्याने यावेळी म्हटलं की, 'कोरोना काळात संसर्गाच्या भीतीनं गावातील लोकं वरातीत सामील होणार नाहीत. अशा स्थितीत त्यांना जबरदस्तीनं लग्नात कसं काय आणलं जाऊ शकतं.' शिवाय पाच लोकांना आणण्याच्या भानगडीत लग्न मोडू नये म्हणून संबंधित वराने पोलिसांना नकार दिला आणि एकटाच लग्नासाठी निघून गेला.

First published:

Tags: Chhatisgarh, Corona, Lockdown, Marriage