धक्कादायक! वडिलांच्या मृतदेहासमोरच लावलं लग्न, त्यांना खुर्चीत बसवून फोटोही काढले!

तामिळनाडूच्या वेल्लुपुरम भागात एक विचित्र आणि अजब घटना घडली. एका मृत व्यक्तीला नाहू घालून लग्नासाठीचे नवे कपडे घालण्यात आले आणि लग्नसमारंभ पार पडला. या मृत व्यक्तीचा नवरदेव मुलगा बोहल्यावर चढला आणि लग्न लागलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 05:21 PM IST

धक्कादायक! वडिलांच्या मृतदेहासमोरच लावलं लग्न, त्यांना खुर्चीत बसवून फोटोही काढले!

वेल्लुपुरम (तामिळनाडू), 10 ऑगस्ट : तामिळनाडूच्या वेल्लुपुरम भागात एक विचित्र आणि अजब घटना घडली. एका मृत व्यक्तीला नाहू घालून लग्नासाठीचे नवे कपडे घालण्यात आले आणि लग्नसमारंभ पार पडला.

या मृत व्यक्तीचा नवरदेव मुलगा बोहल्यावर चढला आणि लग्न लागलं. यानंतर वडिलांचा मृतदेह खुर्चीवर बसवण्यात आला आणि त्यांच्यासोबत सगळ्या कुटुंबाने फोटोही काढले.

सिंगनूर गावात राहणारे 31 वर्षांचे डी. अलेक्झांडर यांचं लग्न 2 डिसेंबरला होणार होतं. पण अलेक्झांडर यांचे वडील देवमणि यांचा 9 ऑगस्टला वडिलांचा मृत्यू ओढवला.

वडिलांची इच्छा केली पूर्ण

देवमणि अलेक्झांडर यांच्या लग्नाची वाट पाहत होते आणि जोरदार तयारीही करत होते. मुलाचं लग्न धुमधडाक्यात करावं असं त्यांना वाटत होतं. पण त्यांचा अचानक मृत्यू ओढवल्याने घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसला. पण अलेक्झांडरने ठरवलं वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बोहल्यावर उभं राहायचं.

Loading...

वधूनेही दाखवली तयारी

अलेक्झांडरने त्याची होणारी पत्नी अन्नपूर्णानी हिच्याशी चर्चा केली. तीसुद्धी याला राजी झाली. मुलाकडचे आणि मुलीकडचे या दोघांनीही तयारी केली आणि लग्नाची वरात काढली. हे लग्न पार पडल्यानंतरच देवमणि यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोन्याचे दर जाणार 40 हजाराच्या पुढे, पैसे कमवण्याची तुमच्याकडे उत्तम संधी

अलेक्झांडरचा लग्न सोहळा आधी मेलम सुब्रमण्यम स्वामी मंदिरात होणार होता. पण देवमणि यांचा मृत्यू ओढवल्यामुळे हे लग्न त्यांच्या मृतदेहासमोरच झालं.

तामिळनाडूमधल्या या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अलेक्झांडर शोक आवरून लग्नाला तयार झाला पण या अशा विचित्र लग्नामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

=========================================================================================

VIDEO : ...म्हणून गिरीश महाजनांनी सेल्फी व्हिडिओत हात उंचावला, मुख्यमंत्र्यांनी केलं समर्थन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 04:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...