दिल्ली, 28 जुलै: एकीकडे मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्याचे प्रयत्न चालू असतानाच दुसरीकडे दिल्ली विद्यापीठाने मात्र मराठी भाषेला अभ्यासक्रमातून वगळले आहे. तसंच मराठी भाषा हा प्रमुख विषय म्हणून घेतल्यास एकूण गुणांमधून 25 टक्के गुणांची कपात करण्यात येईल असा अजब निर्णयही दिल्ली विद्यापीठाने घेतला आहे.
दिल्ली विद्यापीठाने चार प्रमुख विषयातून मराठी, मल्याळम, कन्नड तामिळ ओडिया आणि नेपाळी या भाषा वगळल्या आहेत. या निर्णयाचे कुठलेही स्पष्टीकरण अजून दिल्ली विद्यापीठाने दिलेले नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. आगामी 90वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही दिल्लीत घ्यायच्या हालचाली सध्या चालू आहेत. दरम्यान या निर्णयावर मराठी आणि इतर वगळलेल्या भाषा बोलणाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा