नवी दिल्ली, 27 जुलै : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आजपासून सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी सुरू होणार आहे. पुढील 3 दिवस ही सुनावणी सुरू राहणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतो हे पाहण्याचे ठरणार आहे.
न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. रवींद्र भट यांच्या त्रिसदस्यीय न्यायपीठासमोर 27 जुलैपासून दररोज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी होणार आहे. या वेळी बाजू मांडण्यासाठी प्रत्येक पक्षकारास 3-3 दिवसांचा वेळ मिळणार आहे. त्या वेळी प्रत्येकाने किती वेळ घ्यायचा हे आपसात ठरवून घ्या, मुद्दे रिपिट होऊ नये याची दक्षता घ्यावी, असेही कोर्टाने मागील सुनावणीच्या वेळी सांगितले आहे.
स्टिअरिंग नक्की कुणाच्या हातात? अजित पवारांच्या फोटोमुळे चर्चेला उधाण
तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमिती सदस्य तसेच मराठा आरक्षण लढ्यातील विविध मान्यवरांसोबत बैठक पार पडली होती.
यावेळी उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, समितीचे सदस्य तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार संभाजी राजे छत्रपती, आमदार भाई जगताप, विनायक मेटे, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह न्यायालयात शासनाची बाजू मांडणारे विधीज्ञ उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस, शिवसैनिकांना केली महत्त्वाची सूचना
मराठा आरक्षणाच्या लढ्याशी संबंधित असलेले विविध मान्यवरही यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे व उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांच्याकडून आरक्षण प्रश्नावर त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच सुनावणीसंदर्भातील त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसंदर्भात उपस्थितांशी चर्चा केली होती. तसंच न्यायालयीन कामकाजासंदर्भात चर्चा करून सुनावणीसाठी योग्य त्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या होत्या. त्यामुळे कोर्टाच्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.