नवी दिल्ली, 11ऑगस्ट: आरक्षणासाठी (Maratha Reservation) मागास प्रवर्ग ठरवण्याबाबत राज्यांना अधिकार देणारे विधेयक (Bill) काल लोकसभेत (Loksabha) मांडण्यात आलं. हे विधेयक बहुमतानं मंजूर झालं. आज हे विधेयक राज्यसभेत (Rajyasabha) मांडण्यात येणार आहे. या विधेयकावर काल लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार (ShivSena MP) संजय राऊत (sanjay Raut) यांनी भाजप खासदारांवर टीका केली आहे. या चर्चेदरम्यान भाजपचे खासदार गप्प होते असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
या विधेयकावर राज्यातील बहुतेक खासदारांनी आपली मतं मांडली. मात्र मराठा समाजाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे काहीच बोलले नाहीत, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर (BJP) टीका केली आहे. भाजपच्या खासदारांनी संसदेत तोंड का उघडलं नाही? असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
मला आश्चर्य वाटतं की, महाराष्ट्रातल्या भाजपाच्या खासदारांनी तोंड का उघडलं नाही? त्यांनी सुद्धा बोलायला हवं होतं. रावसाहेब दानवे, नारायण राणे का बोलले नाहीत? जे एकत्र येऊन आंदोलन करत होते त्यांनी या 50 टक्क्यांवर बोलायला हवं होतं, असं संजय राऊत यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं आहे.
धक्कादायक! मुंबई फिल्मसिटीत स्टंट सीन शूट करणं पडलं महागात; भीषण अपघातात कॅमेरामॅनसह कर्मचारी जखमी
पुढे राऊत म्हणाले की, मागास प्रवर्ग ठरवण्याचे अधिकार राज्याला देताना केंद्र सरकारनं आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा उठवायला हवी. पण सरकारनं तसं केलं नसून हा तिढा कायम ठेवला आहे. जोपर्यंत ही मर्यादा उठत नाही तोवर राज्यांना अधिकार देऊन काहीच उपयोग नाही. दरम्यान काल बहुतेक सर्व खासदारांनी हीच मागणी केल्याचं राऊत म्हणालेत.
मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत लाखो लोकांनी मोर्चे काढले. अनेकांनी प्राण गमावले. आत्महत्या केल्या. केंद्र सरकारला हा खेळ वाटतो का?, असं म्हणत आम्ही या विधेयकाला विरोध करू शकलो असतो. पण आम्ही अडथळा आणणार नाही. त्यामुळं सरकारनं आता संवेदनशीलता दाखवून आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा उठवायला हवी, असं संजय राऊत म्हणालेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maratha reservation, Narayan rane, Raosaheb Danve, Sanjay raut, Sanjay Raut (Politician)