S M L

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलावर हल्ल्याचा माओवाद्यांचा प्रयत्न; CRPFच्या जवानांनी उधळला कट

सुरक्षा दलावर भुसूरूंग स्फोटाद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न CRPFच्या जवानांनी उधळून लावला.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 04:20 PM IST

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलावर हल्ल्याचा माओवाद्यांचा प्रयत्न; CRPFच्या जवानांनी उधळला कट

दंतेवाडा, 22 मे : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात अरनपूर ते निलवायाच्या रस्त्यावर सुरक्षा दलाच्या ताफ्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न माओवाद्यांनी केला. यावेळी माओवाद्यांनी भुसुरूंग स्फोटाद्वारे दोन ठिकाणी IED बॉम्ब पेरून ठेवले होते. पण, सीआरपीएफच्या जवानांनी त्या मार्गावरून जाण्यापूर्वी IED बॉम्ब निष्क्रिय केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यापूर्वी देखील माओवाद्यांनी अशाच प्रकार जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केले होते. त्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते. पण, आता CRPFच्या जवानांच्या सतर्कतेमुळे मात्र माओवाद्यांचा मोठा कट उधळला गेला.

15 जवान झाले होते शहीद

यापूर्वी दहशतवाद्यांनी 1 मे रोजी देखील भुसूरूंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते. तशाच प्रकारचा प्रयत्न यावेळी माओवाद्यांनी केला. पण, CRPFच्या जवानांनी त्यांचा कट उधळून लावला. 1 मे रोजी पोलिसांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोटानं हल्ला केला होता. माओवाद्यांनी 25 एप्रिल पुर्वीपासून या हल्ल्याची तयारी सुरू केली होती. तर जवानांवर हल्ला करून, जवानांच्या मृत्यूची खात्री केल्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले होते. सी 60 जवानांवर हल्ला करताना या परिसरात 150 पेक्षा जास्त नक्षलवादी होते. स्फोट होताच जवानांच्या मृत्यूची खात्री करून नक्षली पसार झाले.


कसा झाला प्लॅन

छत्तीसगड आणि गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचे चार-पाच दल एकत्र येऊन एक कंपनी तयार करण्यात आली. जवानांना सापळ्यात अडकवण्यासाठी दानापुर येथे वाहनांची जाळपोळ केली. शीघ्र कृती दलाचे जवान खासगी वाहनातून निघाले असता, त्याची प्रत्येक माहिती खबऱ्यांमार्फत माओवाद्यांपर्यंत पोहोचत होती.

माओवाद्यांच्या स्थानिक दलाने हल्ल्याचा कट रचला आणि इतर दलाची मदत घेतली. हल्ला केल्यानंतर लगेच नक्षलवादी दंडकारण्यात पळून गेले. दंडकारण्य हे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंड या तीन राज्यांच्यामध्ये असलेलं घनदाट जंगल आहे आणि इथे केवळ माओवादीच जातात.

Loading...


VIDEO : आमदाराच्या हत्येनंतर मोठा उद्रेक, रस्त्यावर उतरून लोकांकडून निषेध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: naxalism
First Published: May 22, 2019 04:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close