माओवाद्यांच्या धुमाकूळ सुरूच, कोट्यवधी रुपयांची वाहनं जाळली

माओवाद्यांच्या धुमाकूळ सुरूच, कोट्यवधी रुपयांची वाहनं जाळली

माओवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील कोट्यवधी रूपयांची वाहने जाळली आहेत. यामध्ये तब्बल तीन कोटींचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे.

  • Share this:

रायपूर, 15 मे : छत्तीसगड आणि ओडिशात माओवाद्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. माओवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील कोट्यवधी रूपयांची वाहने जाळली आहेत. यामध्ये तब्बल तीन कोटींचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे.

ओडिशाच्या कालाहांडीच्या जवळील रस्त्याच्या कामावरील दोन कोटींची अकरा वाहने जाळण्यात आली. काल (मंगळवारी) मध्यरात्रीची ही घटना आहे, तर दंतेवाडा जिल्हयातीलही किरंदुल भागात रसत्याच्या कामावरची सत्तर लाखाची चार वाहने जाळली आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठीचं महाराष्ट्रातील मतदान संपल्यानंतर माओवाद्यांनी हैदोस घातला होता. माओवाद्यांनी तब्बल 30 वाहने जाळली असून यामुळे 5 कोटींपेक्षा जास्त रुपयांचं नुकसान झालं होतं.

कुरखेडा तालुक्यातील दानापूर इथं ही घटना घडली आहे. माओवाद्यांनी रात्री 11 ते 3 वाजताच्या सुमारास हे जळीतकांड घडवून आणलं होतं. पुराडा पोलीस स्थानकाअंतर्गत येत असलेल्या दादापूर येथून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होतं.

या कामावरील ट्रक, जेसीबी, ट्रॅक्टर यांसह 30 पेक्षा जास्त वाहनं जाळण्यात आली. तसंच दादापूर येथील डांबर प्लांट, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे कार्यालयही माओवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आलं होतं.


VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 15, 2019 10:50 AM IST

ताज्या बातम्या