निवडणुकीत हिंसाचार घडविण्याचा माओवाद्यांचा इशारा, सुरक्षा दलांचा हाय अलर्ट

निवडणुकीत हिंसाचार घडविण्याचा माओवाद्यांचा इशारा, सुरक्षा दलांचा हाय अलर्ट

माओवाद्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराची धमकी दिल्याने सुरक्षादलांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

  • Share this:

महेश तिवारी, गडचिरोली 7 एप्रिल : गडचिरोली लोकसभा मतदारसंघात तसेच लगतच्या छत्तीसगडमधील बस्तर आणि तेलंगणासही पाच राज्याच्या माओवादप्रभावीत भागात  एकाच दिवशी लोकसभा निवडणुक असणार आहे या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन माओवाद्यानी केले आहे.

दंडकारण्यात माओवाद्यांचा नेहमीप्रमाणे निवडणुकीला विरोध  असुन घातपात घडवण्याची माओवाद्यानी तयारी केल्याचा इशारा गुप्तचर यंञणांनी दिल्याने गडचिरोलीसह दंडकारण्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दडकारण्यातील ही निवडणुक सुरक्षित पार पाडण्याचं आवाहन  सुरक्षा यंञणेसमोर असणार आहे या भागातल्या निवडणुकीवर  केंद्रीय निवडणुक आयोगासह केंद्रीय गृहमंञालयाची नजर असणार आहे.

पहिल्या टप्प्यात निवडणूक

गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेञासह भंडारा गोंदीया या लोकसभा क्षेञात येत्या 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे देशात भौगोलीकदृष्टया सहाशे किलोमीटर लांबीत पसरलेला मतदारसंघ असुन यातला बहुतांश भाग माओवाद्यांच्या कारवाया असलेला भाग आहे  याच मतदारसंघाला लागुनच छत्तीसगडच्या बस्तर लोकसभा क्षेञासह तेलंगणाच्या पेद्दापल्ली लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपुरलाही हाच भाग लागुन आहे.

भंडारा गोंदीयात लोकसभा मतदार संघातला देवरीसह काही भागात माओवाद्याच्या हालचाली आहेत याच 11 एप्रिलला गडचिरोली चिमुरसह भंडारा गोंदीया आणि छत्तीसगडचा बस्तर तेलंगणा तसेच आंध्रचा माओवादप्रभावीत भागासह  छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेजवळ ओरीसाचा मलकानगिरी आणि कोरापुट जिल्हयातही मतदान आहे. हा सगळा भाग दंडकारण्य म्हणून ओळखला जातो.

चार राज्यांना धोका

भौगोलीक दृष्टया तेलंगणाला गडचिरोली जिल्ह्याची सीमा, त्याला लागून छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशसह ओरीसाची सीमा असुन त्या भागात घनदाट जंगलातून वाहणाऱ्या नद्यांनी या राज्याच्या सीमारेषा तयार केल्या आहेत. या दंडकारण्यात वावर असलेल्या माओवाद्यांचा ग्रामपंचायतीपासुन ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीला कायम  विरोध असतो. निवडणुकीवर बहिष्काराचा आवाहन करणारी पञके बॅनर दुर्गम भागात  टाकण्यात आली आहेत. एकाच दिवशी ही निवडणुक असल्याने लोकशाहीचा हा उत्सव सुरक्षीत पार पाडण्याचे नेहमीसारखे आव्हान गडचिरोली जिल्हा पोलीसासह दंडकारण्यातल्या सुरक्षा यंञणेसमोर आहे.

सुरक्षा दल सज्ज

सुरक्षेच्या दृष्टीने बाहेरुन निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकडया जिल्हयात दाखल झाल्या आहेत मतदान पथकांना काही ठिकाणी हेलिकॉप्टर पाठविण्यासह सुरक्षेच्या दृष्टीने निगरानी ठेवण्यासाठी हेलिकॉप्टर आवश्यक असते सध्या गडचिरोली पोलिंसाकडे एक हेलिकॉप्टर असुन वायुदलाची दोन अतिरिक्त हेलिकॉप्टर गडचिरोली पोलीसांच्या मदतीला मिळण्याची शक्यता आहे. एकुणच छत्तीसगड मध्ये तीन दिवसापूर्वी माओवाद्यानी तीन जवानांना ठार करुन हिंसक कारवाया  करण्याचे संकेत दिल्याने या निवडणुकीत दंडकारण्यात सुरक्षा यंञणासमोर मोठं आव्हान उभं झालय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 10:55 PM IST

ताज्या बातम्या