पोलीस ठाणं लुटणारा माओवादी नरसिंहा रेड्डी जेरबंद

पोलीस ठाणं लुटणारा माओवादी नरसिंहा रेड्डी जेरबंद

नरसिंहावर पोलीस ठाणे लुटल्याचा आरोप आहे . गडचिरोलीतलं आसरअल्ली पोलीस ठाणं लुटीच्या घटनेचा तो मास्टरमाईंड आहे.

  • Share this:

24  डिसेंबर:  माओवादी जंपंशा उर्फ नरसिंहा रेड्डी हा तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळते आहे. सहा राज्यांमध्ये वॉन्टेड असलेला नरसिंहा रेड्डीवर एक कोटींचा इनाम आहे.

तेलंगणा पोलिसांनी नरसिंहा रेड्डी आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतलंय. नरसिंहा रेड्डीला अटक झालीय की त्यानं आत्मसमर्पण केलंय हे अजूनही समजू शकलेलं नाही. नरसिंहावर पोलीस ठाणे लुटल्याचा आरोप आहे . गडचिरोलीतलं आसरअल्ली पोलीस ठाणं लुटीच्या घटनेचा तो मास्टरमाईंड आहे.

दंडकारण्यातल्या अनेक पोलीस ठाण्यावरील हल्ल्याच्या योजना आखण्यात रेड्डी तरबेज आहे.    जंपन्ना पोलीसांच्या ताब्यात असल्याने माओवादी चळवळीला धक्का बसला आहे.

त्यामुळे आता गडचिरोली भागातील माओवादी हालचालींना चाप बसतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: December 24, 2017, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading