मराठी बातम्या /बातम्या /देश /एकाच वेळी 55 मेढ्यांचा मृत्यू, मेंढ्यांच्या गूढ मृत्यूनं शेतकऱ्याला मोठा धक्का

एकाच वेळी 55 मेढ्यांचा मृत्यू, मेंढ्यांच्या गूढ मृत्यूनं शेतकऱ्याला मोठा धक्का

एका शेतकऱ्याला नुकताच मोठा आर्थिक फटका बसला आहे. या शेतकऱ्याच्या 55 मेंढ्यांचा गूढ मृत्यू झाला आहे.

एका शेतकऱ्याला नुकताच मोठा आर्थिक फटका बसला आहे. या शेतकऱ्याच्या 55 मेंढ्यांचा गूढ मृत्यू झाला आहे.

एका शेतकऱ्याला नुकताच मोठा आर्थिक फटका बसला आहे. या शेतकऱ्याच्या 55 मेंढ्यांचा गूढ मृत्यू झाला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

    नवी दिल्ली : शेतकऱ्यांना नेहमीच विविध प्रकारच्या आपत्तींचा सामना करावा लागतो. पिकांचं नुकसान होणं, जनावरं दगावणं, कीड-रोगांमुळे पीक नष्ट होणं असे प्रकार कायम घडतात. साहजिकच या गोष्टींचा प्रतिकूल परिणाम शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीवर होतो. अशा प्रकारामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. अलीकडच्या काळात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव जनावरांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. बिबट्या, तरस आणि वाघाच्या हल्ल्यात पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा घटनांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

    वन विभागाने या संदर्भात उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होताना दिसते. छत्तीसगडमधल्या दुर्ग जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याला नुकताच मोठा आर्थिक फटका बसला आहे. या शेतकऱ्याच्या 55 मेंढ्यांचा गूढ मृत्यू झाला आहे. मेंढ्याच्या मृत्यूमागचं कारण तपासण्याचं काम सध्या सुरू आहे. मेंढ्याचा गूढ मृत्यू हा दुर्गमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

      दुर्ग जिल्ह्यातील घटना 

    छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या मालकीच्या 55 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. मेंढ्यांच्या मृत्यूमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एवढ्या मोठ्या संख्येनं मेंढ्या मृ्त्युमुखी पडल्याने शेतकऱ्याला धक्का बसला आहे. ही घटना 1 फेब्रुवारीला रात्री उशिरा घडली. दुर्ग जिल्ह्यातल्या धमधा पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या धमधा आणि दारगावजवळच्या ठेंगा भाटा गावातल्या रतन धनकर या शेतकऱ्याने 55 मेंढ्या पाळल्या होत्या. रोजच्या सवयीनुसार तो संध्याकाळच्या वेळेस मेंढ्यांना पाहण्यासाठी गेला असता त्याला धक्कादायक चित्र दिसलं. अज्ञात कारणामुळे त्याच्या 55 मेंढ्यांचा मृत्यू झाला होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, दारगाव परिसरात काही दिवसांपूर्वी एका तरसाचा वावर होता. या तरसाने गावातल्या काही जनावरांची एकाच वेळी शिकार केली होती. त्यामुळे या मेंढ्यांच्या मृत्यूसाठी वन्य प्राणी कारणीभूत आहे का हेदेखील तपासलं जात आहे.

    शेतकऱ्याला धक्का  

    दरम्यान, मृत मेंढ्या पाहून रमेश धनकर यांना जबर धक्का बसला आहे. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती परिसरातल्या अधिकाऱ्यांना दिली. एवढ्या मोठ्या संख्येने मेंढ्या मृत होण्यामागे काय कारण आहे, याचा तपास सध्या केला जात आहे. या मेंढ्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून तपासानंतर ते स्पष्ट होईल; मात्र 55 मेंढ्यांच्या मृत्यूमुळे रमेश धनकर या शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून, मेंढ्यांच्या गूढ मृत्यूविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.

    First published: