CBI Vs Police : ममता बॅनर्जींना विरोधी पक्षांचा पाठिंबा, कोलकत्यात तणाव!

CBI Vs Police : ममता बॅनर्जींना विरोधी पक्षांचा पाठिंबा, कोलकत्यात तणाव!

कोलकता पोलिसांच्या भूमिकेविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती सीबीआयचे हंगामी प्रमुख नागेश्वर राव यांनी दिली आहे

  • Share this:

कोलकता 03 फेब्रुवारी : सीबीआय विरुद्ध कोलकता पोलीस या नाट्यानंतर कोलकत्यात तणाव निर्माण झाला. रात्री उशीरा कोलकता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सोडून दिली. त्यानंतर शहरात तणाव निर्माण झालाय. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतळे जाळले असून काही ठिकाणी ट्रेनही थांबविण्यात आल्या आहेत.

केंद्र  सरकारवर दडपशाहीचा आरोप करत ममता बॅनर्जी रात्रभर धरणं आंदोलन करणार आहेत. या घटनेनंतर देशभरातल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा व्यक्त केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नते शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, मायावती, अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा व्यक्त केला आहे. तर अनेक नेते सोमवारी कोलकत्यात येण्याची शक्यता आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ममता बॅनर्जींना आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.

सीबीआय सुप्रीम कोर्टात जाणार

कोलकता पोलिसांच्या भूमिकेविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती सीबीआयचे हंगामी प्रमुख नागेश्वर राव यांनी दिली आहे. ते म्हणाले आम्ही आमच्या कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. सोमवारी आम्ही सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करू. कोलकत्याचे पोलीस आयुक्त  राजीव कुमार यांच्य विरुद्ध भक्कम पुरावे असून ते पुरावे नष्ट करत होते असा आरोपही त्यांनी केला.

कोलकत्यात काय झालं?

पश्चिम बंगालमधील पोलीस आणि सीबीआयमध्ये सुरू असलेल्या वादाचा पुढचा अध्याय पाहायाला मिळाला. बहुचर्चित शारदा चिटफंट घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. या घोटाळ्यामध्ये कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचं देखील नाव आहे.

त्यामुळे त्यांच्या घरी छापा मारण्यासाठी म्हणून दाखल झालेल्या सीबीआयच्या टीमशी पोलिसांची बाचाबाची झाली. यावर हे सारं प्रकरण थांबलं नाही तर, पश्चिम बंगाल पोलिसांनी सीबीआयच्या ५ अधिकाऱ्यांना ताब्यात घेत थेट पोलीस स्टेशन देखील गाठलं.

या साऱ्या घडामोडींबाबत कळताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील  पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी दाखल झाल्या. शारदा चिटफंट घोटाळ्यामध्ये तृणमूलच्या अनेक नेत्यांच्या सहभागाचाही आरोप आहे.  दरम्यान, मागील काही दिवसांपासून राजीव कुमार बेपत्ता असल्याचं बोललं जात आहे.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर राजीव कुमार यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली आहे. या साऱ्या प्रकरणामध्ये ममता बॅनर्जी यांनी मात्र राजीव कुमार यांची बाजू घेतली आहे.

दीदींचं आंदोलन

पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्यात रविवारी हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. ज्या संस्थांवर चौकशी आणि सुरक्षेची जबाबदारी असते अशा सीबीआय आणि पोलीस या दोन संस्थाच एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याने नवा वाद निर्माण झालाय. कोलकत्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारपासून सत्याग्रह करणार आहेत.

First published: February 3, 2019, 11:44 PM IST

ताज्या बातम्या