गौरी लंकेश यांच्या संशयित मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर गिरीश कर्नाड !

गौरी लंकेश यांच्या संशयित मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर गिरीश कर्नाड !

पत्रकार गौरी लंकेश यांच्या संशयित मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर ज्येष्ठ नाटककार गिरीश कर्नाडही आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 जून : पत्रकार गौरी लंकेश यांच्या संशयित मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर ज्येष्ठ नाटककार गिरीश कर्नाडही आहेत, अशी महत्वाची माहिती कर्नाटक एसआयटीमधल्या सूत्रांनी दिली आहे.

संशयितांकडून एसआयटीला एक डायरी मिळाली आहे, ज्यामध्ये देवनागरी लिपीत हिटलिस्टवरच्या लोकांची नावं सापडली. कर्नाड यांच्या व्यतिरिक्त, लेखिका बीटी ललिता नाईक, वीरभद्र चन्नमाला स्वामी आणि सीएस द्वारकानाथ यांचाही नावं डायरीमध्ये होती.

ही संबंधित नावं क्रांतिकारी हिंदू धर्माच्या विरुद्ध चर्चेसाठी होती. एसआयटीने कालच सांगितल्याप्रमाणे कर्नाटकमधील विजयपुरा जिल्ह्यातील सिंधागीमधून परशुराम वाघमारे (26) याला अटक करण्यात आली आहे. परंतु या षड्यंत्रात त्याची भूमिका आणि इतर माहिती अद्याप उघडकीस आली नाही.

पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, परशुरम वाघमारे हा गौरी लंकेश यांचा मारेकरी असू शकतो कारण, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या व्यक्तिची शरीर दृष्टी ही वाघमारेसारखी आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, असं म्हटलं जातं की, परशुराम वाघमारे याचे हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध होते. त्यामुळे आता पोलीस तपासात काय समोर येत याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

First published: June 14, 2018, 8:08 AM IST

ताज्या बातम्या