मतदारयादीत नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासोबतच पप्पू, फेकू आणि राफेलही

नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, मायावती यासारखे नेते लोकसभा निवडणुकीत उमेदवार आहेत आणि मतदारही. पण या नेत्यांच्या नावांसारखी नावं असलेले बरेच मतदार मतदारयादीत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 07:11 PM IST

मतदारयादीत नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासोबतच पप्पू, फेकू आणि राफेलही

नवी दिल्ली, 29 एप्रिल : नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, मायावती यासारखे नेते लोकसभा निवडणुकीत उमेदवार आहेत आणि मतदारही. पण या नेत्यांच्या नावांसारखी नावं असलेले बरेच मतदार मतदारयादीत आहेत. नरेंद्र मोदी अशा नावाने 212 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. एवढंच नाही तर राहुल गांधी असं नाव असलेले 783 मतदार आहेत.

नावात काय आहे?

नावात काय आहे ? असं म्हटलं जातं पण ज्या मतदाराचं नाव नरेंद्र मोदी असं आहे त्याच्या नावाला आणि मताला किंमत ही येणारच. यामध्येही नरेंद्र मोदी नावाच्या मतदारांनी राहुल गांधींना मतदान केलेलं असू शकतं किंवा राहुल गांधी नावाच्या मतदारांनी नरेंद्र मोदींना मत दिलं असण्याची शक्यता आहे.

पप्पू, फेकू अशीही नावं

निवडणूक आयोगाच्या मतदार हेल्पलाइननुसार, या यादीत पप्पू, फेकू अशा नावानेही मतदारांची नोंद झाली आहे. पप्पू नावाचे 4 लाख 80 हजार 120 मतदार आहेत तर फेकू नावाचे 15,248 मतदार आहेत.

Loading...

मिराज, मिग, सुखोई, राफेल या नावानेही मतदारांनी नोंदी केल्या आहेत. अर्थात हे मतदार किती अधिकृत आहेत आणि किती नाही याबदद्ल शंकाच आहे.

मायावती नावाचे 27 हजार 285 मतदार

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या नावाने मतदारयादीत नोंद असणाऱ्यांची संख्याही कमी नाही. देशभरात मायावती नावाच्या 27 हजार 285 मतदार आहेत. अमित शहा यांच्या नावाने 12 हजार 935 मतदार आहेत तर गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नावाने 2 हजार 329 मतदार आहेत.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाने 101 मतदार आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारखं नाव असलेल्या 76 मतदारांची नोंद झाली आहे. भोपाळच्या भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासारखं नाव असलेल्या आणखी एक महिला उमेदवाराने इथून अर्ज भरला होता. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या नावाचेही 207 मतदारही आहेत.

====================================================================================

VIDEO : शाहरुख खान सहकुटुंब पोहोचला मतदानाला!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 07:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...