नवी दिल्ली, 7 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) बुधवारी रात्री होणार आहे. यासाठी एकूण 43 जणांच्या नावाची निश्चित झाल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. नव्या चेहऱ्यांमध्ये वकील,(Lawyers) डॉक्टर (Doctors) आणि इंजिनिअर्सचं (Engineers) प्रमाण लक्षणीय असल्याचं चित्र आहे. तर या मंत्रिमंडळ विस्तारात तब्बल 4 माजी मुख्यमंत्र्यांचाही (Ex Chief Ministers) समावेश असणार आहे.
बुधवारी रात्री एकूण 43 जणांचा शपथविधी पार पडणार असून त्याची यादी भाजपमधील सूत्रांकडून माध्यमांना मिळाली आहे. या यादीवर नजर टाकली, तर त्यात 4 माजी मुख्यमंत्र्यांचा आणि 18 माजी राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या यादीत 13 वकिल, 6 डॉक्टर्स आणि 5 इंजिनिअर्स यांचा समावेश आहे. तर या यादीतील पाच जण हे एकेकाळी शासकीय नोकर असल्याचंही स्पष्ट होत आहे.
मंत्रिमंडळाचं वय
सध्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचं सरासरी वय आहे 58. नव्या यादीतील 14 मंत्री असे आहेत, ज्यांचं वय 50 पेक्षा कमी आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचं सरासरी वय काही प्रमाणात कमी होईल, असा अंदाज आहे. या मंत्रिमंडळात नव्याने 11 महिलांचा समावेश होणार आहे. वयोवृद्ध नेत्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं आणि तरुणांना पदांवर काम करण्याची संधी द्यावी, असं आपलं धोरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 सालीच जाहीर केलं होतं. त्यानुसार या विस्तारातही मंत्र्यांचं वय कमी असल्याचं दिसून येत आहे.
हे वाचा - नव्या मंत्र्यांच्या शपथविधीआधी राजीनाम्यांना जोर, ‘या’ मंत्र्यांची खुर्ची रिकामी
धार्मिक समतोल
नव्या मंत्रिमंडळात 5 अल्पसंख्याक समुदायातील मंत्र्यांचा समावेश कऱण्यात येणार आहे. यामध्ये 1 मुस्लिम, 1 शिख, 2 बौद्ध आणि 1 ईसाई समाजातील मंत्र्यांचा सहभाग असणार आहे. तर 27 नवे मंत्री हे ओबीसी समाजातील असणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Politics, Union cabinet