मराठी बातम्या /बातम्या /देश /भेगाळलेले रस्ते, जमिनीतून येणारं पाणी अन् घरांना तडे; उत्तराखंडमधील त्या शहरात काय घडतंय? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

भेगाळलेले रस्ते, जमिनीतून येणारं पाणी अन् घरांना तडे; उत्तराखंडमधील त्या शहरात काय घडतंय? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

हे एखाद्या चित्रपटातील दृश्य नसून उत्तराखंडमधील जोशीमठ शहरातील स्थिती आहे. या शहरातील घरांच्या भिंती कोसळू लागल्यामुळे येथील लोक भयभीत झालेत. अनेकजण गाव सोडून जाऊ लागलेत.

हे एखाद्या चित्रपटातील दृश्य नसून उत्तराखंडमधील जोशीमठ शहरातील स्थिती आहे. या शहरातील घरांच्या भिंती कोसळू लागल्यामुळे येथील लोक भयभीत झालेत. अनेकजण गाव सोडून जाऊ लागलेत.

हे एखाद्या चित्रपटातील दृश्य नसून उत्तराखंडमधील जोशीमठ शहरातील स्थिती आहे. या शहरातील घरांच्या भिंती कोसळू लागल्यामुळे येथील लोक भयभीत झालेत. अनेकजण गाव सोडून जाऊ लागलेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Uttarakhand (Uttaranchal), India

    देहरादून 07 जानेवारी : घरांच्या भिंतीना जात असलेले तडे... रस्त्यांना पडणाऱ्या भेगा... अचानक पडणारी घरं... हे एखाद्या चित्रपटातील दृश्य नसून उत्तराखंडमधील जोशीमठ शहरातील स्थिती आहे. या शहरातील घरांच्या भिंती कोसळू लागल्यामुळे येथील लोक भयभीत झालेत. अनेकजण गाव सोडून जाऊ लागलेत. या प्रकाराची गंभीर दखल उत्तराखंड सरकारनं घेतली असून तातडीची उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. दरम्यान, उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिबच्या मार्गावर असणारं जोशीमठ समुद्रसपाटीपासून 6000 फूट उंचीवर असून भूकंपाचा धोका असलेल्या 'झोन-फाइव्ह'मध्ये येतं.

    ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय. उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये जे काही घडत आहे, ते एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल असंच आहे. इथे शेकडो घरांना तडे जात असून, जमीनदेखील खचू लागली आहे. त्यामुळे येथील लोकांचं स्थलांतर सुरू झालं आहे. शेकडो कुटुंब या गावातून अन्यत्र स्थलांतरित होत आहेत. पण जोशीमठमध्ये असे का होत आहे, ज्यामुळे लोकांना गाव सोडून जाण्याची वेळ आली? असा प्रश्न यानिमित्तानं अनेकांच्या मनात निर्माण झालाय. त्यातच काल, शुक्रवारी (6 जानेवारी 2023) उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही जोशीमठ येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली.

    रुग्णवाहिका चालकाने जास्त पैसे, मजूराने आईचा मृतदेह घेतला खांद्यावर अन्...

    या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री धामी यांनी नागरिकांना त्यांचं पुनर्वसन होईपर्यंत सुरक्षित ठिकाणी नेण्याचे आदेश दिले. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जोशीमठ मधील सुमारे 600 कुटुंबांना तातडीनं बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात यावं, असेही आदेश दिलेत.

    आतापर्यंत 66 कुटुंबांचं स्थलांतर

    जोशीमठमधील अनेक घरांना तडे गेल्यानं किमान 66 कुटुंबांचं स्थलांतर झालं आहे. तर इतरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. या भागातील भूस्खलनामुळे 3000 हून अधिक लोक प्रभावित झालेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन.के. जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशीमठमधील विविध भागांत आतापर्यंत 561 घरांना भेगा पडल्या आहेत. यामध्ये रविग्राममधील 153, गांधीनगरमधील 127, मनोहरबागमधील 71, सिंहधारमध्ये 52, परासरीतील 50, अप्पर बाजारातील 29, सुनीलमध्ये 27, मारवाडीतील 28 आणि लोअर बाजारमधील 24 घरांचा समावेश आहे.

    म्हणून लोकांनी प्रशासनाच्या विरोधात काढला मोर्चा

    जोशी मठमधील घरांना तडे का पडत आहेत, आणि तेथील जमीन का खचत आहे, हे जाणून घेण्यापूर्वी नुकतीच घडलेली घटना जाणून घेऊयात. गेल्या वर्षी 24 डिसेंबर 2022 रोजी जोशीमठमधील वेगवेगळ्या घरांना तडे गेल्याचं आणि जमीन खचल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तेथील स्थानिकांनी याबाबत माहिती दिली. त्यावर नगरपालिकेनं केलेल्या पाहणीनंतर एका वर्षात शहरातील पाचशेहून अधिक घरांना तडे गेल्याचं समोर आलं. यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतली गेल्यानं नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला.

    सम्मेद शिखर पर्यटनस्थळाचा वाद पेटणार? आणखी एका जैन मुनींचा देहत्याग

    तीन दिवसांनंतर, म्हणजे 27 डिसेंबर 2022 रोजी तज्ज्ञांच्या पाच सदस्यीय पथकानं शहराची पाहणी केली. या टीममध्ये वरिष्ठ अधिकारी, भूवैज्ञानिक तज्ज्ञ आणि इंजिनीअर यांचा समावेश होता. ज्या घरांना भेगा पडल्या आहेत, त्यांची त्यांनी पाहणी केली. याशिवाय अधिकाऱ्यांनी ज्यांच्या घरांना भेगा पडल्या आहेत, अशा लोकांशी सुद्धा चर्चा केली. यानंतर पाच सदस्यीय पथकानं जिल्हा प्रशासनाला अहवाल दिला होता.

    घरांच्या भिंतीना तडे गेले, कारण...

    जोशीमठमधील इमारती आणि भिंतींना तडे गेल्याची नोंद 2021 मध्ये पहिल्यांदा झाली होती. कारण चमोलीमध्ये वारंवार भूस्खलन आणि पूर येत होता. वृत्तानुसार, उत्तराखंड सरकारच्या तज्ज्ञ समितीला 2022 मध्ये असे आढळून आले की, जोशीमठचा काही भाग मानवनिर्मित आणि नैसर्गिक कारणांमुळे बुडत आहे. जोशीमठमध्ये पृथ्वीचा पृष्ठभाग, अस्ताव्यस्त बांधकाम, पाण्याची गळती, जमिनीची धूप आणि इतर मानवनिर्मित कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा आल्याने भूस्खलन होत असल्याचे समितीचे निष्कर्ष सांगतात. तसंच तज्ज्ञांनी सध्या उद्भवलेल्या परिस्थितीला नैसर्गिक कारण असल्याचंदेखील सांगितलं आहे. याशिवाय, डोंगर खोदणं, इमारतींचं जलद बांधकाम, जलविद्युत प्रकल्प आणि राष्ट्रीय महामार्ग आदी कारणेही सांगितली आहे.

    First published:

    Tags: Shocking news, Uttarakhand