IIT झालं कोरोनाचं हॉटस्पॉट, ‘मेस’मुळे 71 जणांना COVIDची लागण झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

IIT झालं कोरोनाचं हॉटस्पॉट, ‘मेस’मुळे 71 जणांना COVIDची लागण झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

देशातल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 98.84 लाख झाला आहे. त्यातले 93.87 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 1.43 लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

चेन्नई 14 डिसेंबर: देशात कोरोनाचा (Covid-19)  वेग मंदावला असला तरी अनेक भागांमध्ये त्याचा परिणाम अजुनही जाणवतो आहे. आयआयटी मद्रास (IIT- Madras)मध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे अनेक विभाग बंद करावे लागले आहेत. गेल्या महिनाभरात 71 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे तब्बल 700 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्राध्यपकांना आणि विद्यार्थ्यांना पुन्हा घरूनच काम करण्यास सांगण्यात आलं आहे. मेस मध्ये जेवतांना सगळेच मास्क काढतात त्यामुळे तिथे कमीत कमी गर्दी कशी होईल याची काळजी घेतली पाहिजे. मात्र ती काळजी घेतली जात नाही असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

तर फक्त 10 टक्के लोकांनाच कॅम्पसमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. त्याचबरोबर इथं राहणाऱ्या सगळ्यांची टेस्टिंगही करण्यात येत असून विद्यर्थ्यांना पॅक जेवणाचं पार्सल पाठविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. जे रिसर्च स्कॉलर्स पुन्हा येऊ इच्छितात त्यांना परवानगी दिली आहे. मात्र गावावरून परत आल्यानंतर काही दिवस त्यांना क्वारंटाईन राहावं लागणार आहे.

कोरोनाकाळात काम करताना कामकाजाची नियमावली तयार करण्यात आली असून त्यानुसार कामकाज करण्यात येत असल्याचंही प्रशासनाने म्हटलं आहे. सगळ्यांनी काटेकोरपणे नियमांचं पालन केलं तर कोरोनाच्या प्रसाराला अटकाम करू शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

देशातल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 98.84 लाख झाला आहे. त्यातले 93.87 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 1.43 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3.51 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 13 डिसेंबरला एकाच दिवसात 76 हजार 363 उपचाराधिन रुग्णांना घरी सोडण्यात आलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 14, 2020, 3:49 PM IST
Tags: IIT

ताज्या बातम्या