आर्मी शर्ट घालून भाजपच्या मनोज तिवारींचा निवडणूक प्रचार, नेटिझन्सनी केलं ट्रोल

आर्मी शर्ट घालून भाजपच्या मनोज तिवारींचा निवडणूक प्रचार, नेटिझन्सनी केलं ट्रोल

निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपच्या मनोज तिवारींनी परिधान केलं आर्मीच्या गणवेशासारखं शर्ट

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मार्च : दिल्ली भाजपचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांना  भारतीय लष्कराच्या गणवेशासारखा शर्ट परिधान करून निवडणुकीचा प्रचार करणं चांगलंच महाग पडलं आहे. यावरुन सोशल मीडियावर नेटिझन्सकडून मनोज तिवारी यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे. भाजपच्या 'विजय संकल्प' बाईक रॅलीदरम्यान मनोज तिवारींनी आर्मी प्रिंटचे शर्ट परिधान केलं होतं. 'मनोज तिवारी हे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या देशवापसीचे राजकारण आणि भारतीय जवानांचा अपमान करताहेत', असा आरोप नेटिझन्स करत आहेत.

शनिवारी (2 मार्च)मनोज तिवारींनी भाजपाच्या विजय संकल्प बाईक रॅलीदरम्यान आर्मी प्रिंटचे शर्ट परिधान केले होते. रॅलीच्या सुरुवातीला त्यांनी अभिनंदन यांच्यावरील एक कविता उपस्थितांनी ऐकवली आणि रॅलीला सुरूवात केली.

तिवारींवर चौफेर टीका

निवडणुकीच्या प्रचारासाठी आर्मीच्या गणवेशासारख्या कपड्यांचा वापर केल्यानं राजकीय नेत्यांसहीत सर्वसामान्य नागरिकांनीही मनोज तिवारींना धारेवर धरले आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक-ओ-ब्रायन यांनी तिवारींच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करणारे ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की,' भाजपचे खासदार आणि दिल्ली भाजपचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी भारतीय लष्कराचा गणवेश घालून मतं मागत आहेत. भाजपाकडून जवानांचा अपमान आणि राजकारण केलं जात आहे. यानंतर तेच देशभक्तीवरील धडेदेखील देतात.'
दरम्यान, तिवारींनी भाजपच्या रॅलीचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांनी भारतीय लष्कराच्या गणवेशासारखे शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. यामुळे सर्व स्तरातून त्यांच्या कडाडून टीका होत आहे. चौफेर टीकास्त्र सोडले जात असल्यानं तिवारींनी ट्विटरवर स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

मनोज तिवारींचे स्पष्टीकरण

'मला आपल्या सैन्यांचा अभिमान आहे, यासाठी मी भारतीय लष्कराच्या गणवेशसारखा शर्ट घातला. मी सैन्यात नाही पण आपल्या वागणुकीद्वारे एकतेची भावना व्यक्त करत होतो. भारतीय सेनेचा अपमान केल्याच्या दृष्टीने याकडे का पाहिलं जातंय?. आपल्या सैन्याचा मी आदर करतो. या तर्कानुसार जर मी उद्यापासून नेहरू जॅकेट वापरू लागलो तर मग पं.जवाहरलाल नेहरूंचा अपमान केल्यासारखे होईल का?' असे ट्विट तिवारींनी केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 09:04 AM IST

ताज्या बातम्या