भोजपुरी कलाकार मनोज पांडे बलात्कार प्रकरणी अटकेत

भोजपुरी कलाकार मनोज पांडे बलात्कार प्रकरणी अटकेत

तक्रारीनुसार पीडित महिला मनोज पांडेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तरीही तो दुसऱ्या मुलींशी शारीरिक संबंध ठेवत होता. जी मुलगी त्याच्याशी मैत्री करायची तिला चित्रपटात काम देतो असं सांगून फसवायचा असं पीडितेचं म्हणणं आहे

  • Share this:

कल्याण, 22 सप्टेंबर: भोजपुरी अभिनेता मनोज पांडे बलात्कार प्रकरणात अटक झाली आहे. पोलिसांनी कल्याणमधून त्याला अटक केली आहे.

15 सप्टेंबरला मनोज पांडे विरूद्ध चारकोप पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनुसार पीडित महिला मनोज पांडेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तरीही तो दुसऱ्या मुलींशी शारीरिक संबंध ठेवत होता. जी मुलगी त्याच्याशी मैत्री करायची तिला चित्रपटात काम देतो असं सांगून फसवायचा असं पीडितेचं म्हणणं आहे. तसंच तिचा जबरदस्ती गर्भपात केल्याचंही तिने सांगितलं . दरम्यान आयपीसी 395/17, 376, 317, 406, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: September 22, 2017, 9:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading